Manoj Jarange Health Update: मराठा आरक्षण उपोषण मनोज जरांगे यांच्या प्रकृतीला पडतंय भारी, लो बीपी, किडनीवर परिणाम; डॉक्टरांकडून मेडीकल बुलेटीन जारी

परिणामी केवळ पाणी आणि सलाईनवर असलेल्या जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला असून किडनीवरही परिणाम होत आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जारी केलेल्या मेडीकल बुलेटीनमधून ही माहिती पुढे आहे. उपोषणस्थळी दाखल झालेले आरोग्य विभागाचे पथक त्यांच्यावर बारीक लक्ष ठेऊन आहे.

Manoj Jarange | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Manoj Jarange Medical Bulletin: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावली आहे. पाठिमागील काही दिवसांपासून ते मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर उपोषणाला बसले आहेत. पाठिमागील काही दिवसांपासून त्यांच्या शरीरात अन्नाचा कणही गेला नाही. परिणामी केवळ पाणी आणि सलाईनवर असलेल्या जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला असून किडनीवरही परिणाम होत आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जारी केलेल्या मेडीकल बुलेटीनमधून ही माहिती पुढे आहे. उपोषणस्थळी दाखल झालेले आरोग्य विभागाचे पथक त्यांच्यावर बारीक लक्ष ठेऊन आहे.

डॉक्टरांनी जारी केलेल्या मेडीकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे की, मनोज जरांगे यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली आहे. त्यांचे जलप्राषणाचे प्रमाण कमी झाल्याने युरीन आऊटपूटही घटले आहे. रक्तातील बिली रुबिन प्रमाणही वाढते आहे. ज्याचा संभाव्य परिणाम किडणीच्या त्रासात होऊ शकतो. परिणामी त्यांना अँटीबायोटिक सुरु केली आहे. सध्या त्यांना सलाईनवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती कशी साथ देते यावर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यांची प्रकृती पाहता मराठा मोर्चातील आंदोलकरही चिंतेत आहे. सरकारने काही सकारात्मक निर्णय घेतला तर निश्चित असा तोडगाही निघेल आणि जरांगे यांचे उपोषणही सुटेल, असे आंदोलकांचे मत आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील मराठ्यांकडे जर निजामकालीन शैक्षणिक आणि महसुली नोंदी असल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या प्रमाणपत्रासंदर्भात माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. तसेच, त्यासंदर्भात मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेनुसार जीआर लवकरच काढला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. यासंदर्भात झालेला निर्णय जरांगे यांना कळविण्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राजेश टोपे आणि अर्जुन खोतकर यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. या संदर्भात जरांगे आपला निर्णय सकाळी 11 वाजता कळवणार होते. त्यांच्या निर्णयाबाबत उत्सुकता आहे.