Manjushree Oak: पुण्याच्या मंजुश्री ओक यांचा विश्वविक्रम, वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये गायली 121 गाणी; Guinness Book of World Records ने घेतली दखल

पुणे येथील गायिका मंजुश्री ओक (Manjushree Oak) यांनी केलेल्या विक्रमाची थेट 'गुनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' (Guinness Book of World Records) ने नोंद घेतली आहे. मंजुश्री ओक यांनी यांनी भारतातील वेगवेगळ्या तबबल 121 भाषांध्ये तब्बल साडेतेरा तास गायन केले. ‘अमृतवाणी - अनेकता मैं एकता’ (Amrutwani – Anekta Me Ekta) या कार्यक्रमासाठी त्यांनी मैफील रंगवली.

Manjushree Oak | (Photo Credits: Youtube)

पुणे येथील गायिका मंजुश्री ओक (Manjushree Oak) यांनी केलेल्या विक्रमाची थेट 'गुनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' (Guinness Book of World Records) ने नोंद घेतली आहे. मंजुश्री ओक यांनी यांनी भारतातील वेगवेगळ्या तबबल 121 भाषांध्ये तब्बल साडेतेरा तास गायन केले. ‘अमृतवाणी - अनेकता मैं एकता’ (Amrutwani – Anekta Me Ekta) या कार्यक्रमासाठी त्यांनी मैफील रंगवली. ज्याचा चक्क जागतिक विक्रम झाला आणि या विक्रमाची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये करण्यात आली. पुणे येथे पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ( Yashwantrao Chavan Auditorium ही मैफील पार पडली.

एकाच मैफिलीत वेगवेगळ्या भाषांमध्ये गायन केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने मंजुश्री ओक यांची दखल घेतली. मंजुश्री ओक यांना पाठिमागच्या आठवड्यात तिच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतल्याबद्दल पत्र मिळाले. हे पत्र मिळाल्यानंतर मंजुश्री ओक यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, माझे वडील आणि आई प्रखर देशभक्त होते. त्यांनी माझ्यावर सातत्याने ठसवले की, आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे देशाची सेवा केली पाहिजे. (हेही वाचा, Marathon शर्यतीत Kolhapur तील एका धावपटूने गमावला जीव, Guinness Book of World Records मध्येही कोरले होते नाव)

मंजुश्री ओक यांनी सांगितले की, तिने लहानपणीच तिच्या वडिलांकडे म्हणजेच वसंत ओक यांच्याकडे गाणे शिकायला सुरुवात केली. वडिलांसोबत प्रथम गायनाचे धडे गिरवल्यानंतर त्यांनी पंडित हृदयनाथ मंगेशर यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि गायन सुरु केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रोकॉर्डच्या अधिकृत संकेतस्थळावरही मंजुश्री ओक यांच्या विक्रामाची नोंद आढळते.

भारत हा भाषिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देश आहे ज्यामध्ये भाषा, बोली आणि उप-भाषा आहेत. भारतीय संविधानाने अधिकृतपणे मान्यता दिलेल्या २२ भाषांना मान्यता दिली आहे आणि देशभरात शेकडो इतर प्रादेशिक भाषा आणि बोली बोलल्या जातात.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड.ज्याला पूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून ओळखले जात असे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे दरवर्षी प्रकाशित होणारे एक संदर्भ पुस्तक आहे. ज्यामध्ये मानवी कामगिरी आणि नैसर्गिक चमत्कार या दोन्ही जागतिक विक्रमांची नोंद केली जाते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now