नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळले, मित्राकडून तरुणाची हत्या
शासकीय नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकाळणाऱ्या एका तरुणाचे त्याचा मित्राची हत्या केल्याची घडना घडली आहे.
शासकीय नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकाळणाऱ्या एका तरुणाचे त्याचा मित्राची हत्या केल्याची घडना घडली आहे. तर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अनिल सनप आणि संतोष बागडे हे दोघे मित्र असून ते कल्याणमध्ये राहतात. तर संतोषने 2017 मध्ये अनिलला मी तुला शासकीय नोकरी मिळवून देतो असे सांगितले. तसेच ही नोकरी हवी असेल तर तु मला काही पैसे दे असे म्हणून अनिल कडून चक्क 35 लाख रुपये संतोषने लाटले. नोकरीची हमी मिळेल या आशेने अनिल पुन्हा संतोषला त्याबद्दल विचारण्यास गेला होता. मात्र त्यावेळी संतोषने आपण नोकरीचे अमिष दाखवून पैसे उकळले असल्याचे अनिल याला सांगितले. त्याचवेळी संतोषने अनिलला बिर्ला महाविद्यालयाजवळ भेटलेल्या ठिकाणी त्याची हत्या केली आहे.
या घटनेतील आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. तसेच मृत अनिलचे शरीर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्हाची कबुली दिली असून आपणच अनिल याला शासकीय नोकरी देतो असे सांगून पैसे उकळल्याचे पोलिसांना सांगितले आहे.