Thane Crime News: मुलाला मारल्याच्या रागातून भावानेच केली बहिणीची हत्या, ठाण्यातून आरोपीला अटक
विवाहीत बहिणीने मुलाला मारल्याने आणि शिवीगाळ केल्याने मुलाच्या वडिलांना आपल्या बहिणीची हत्या केली आहे.
Thane Crime News:ठाणे शहर एका धक्कादायक घटनेमुळे हादरुन गेले आहे. येथील कोंकणी पाडा चाळ परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने केलेल्या बेदम मरहाणीत महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (29 ऑक्टोबर) घडली. पोलिसांनी आरोपीला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. प्राप्त माहतीनुसार, पीडितेने आरोपीच्या अल्पवयीन मुलाला केलेल्या मारहाणीचा राग मनात धरुन आरोपीने हे कृत्य केले. धक्कादायक म्हणजे आरोपी आणि पीडिता हे एकमेकांचे नातलग आहेत. दोघांमध्ये भावा-बहिणीचे नाते आहे. आरोपीने पीडितेला लोखंडी पाईपने मारहाण केली. याच वेळी त्याने पीडितेच्या मुलीलाही मारहाण केली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या बहिणीने त्याच्या मुलाला काही कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केली होती. ही घटना मुलाने त्याच्या वडिलांना सांगितली. या गोष्टीमुळे भावाला बहिणीचा राग आला. तीच्या घरी जाऊन आरोपी भावाने बहिणीला या गोष्टीचा जाब विचारला, तिच्यासोबत भांडण करत त्याने रागाच्या भरात लोखंडी पाईपाने बहिणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. घरी उपस्थित महिलेच्या मुलाने दोघांत मध्यस्थी करण्यास सुरु केली. परंतु आरोपीने मुलाला देखील भरपूर मारहाण केली. मुलाला या घटनेत गंभीर जखम झाल्या. मारहाणीत महिलेला डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे तीचा मृत्यू झाला. दोघांना ही स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलावर सद्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, आरोपी गुन्हा दाखल केला. त्याला त्याच्या ठाण्यातील घरातून अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०३ (खूनाची शिक्षा) आणि ३०७ (हत्येचा प्रयत्न) कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संजू लोखंडे (३०) असं आरोपीचे नाव आहे. तर दुर्गा अनिल कुंटे असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेचा गंभीर जखमी मुलागा यश १४ वर्षांचा आहे.