Mumbai Shocker: वादातून कात्र्या पोटात खुपसलेल्या अवस्थेमध्ये सापडला तरूण; विलेपार्लेमधील घटना

अनिरूद्ध ने पोटात कात्री खुपल्याच्या अवस्थेमध्येही मित्राकडून मदत मिळवली आणि अनिरूद्धच्या मित्राने त्याला हॉस्पिटल मध्ये नेले.

Crime (PC- File Image)

मुंबई (Mumbai) मध्ये एक 32 वर्षीय व्यक्तीच्या पोटात कात्र्या (Scissors) रूतल्याच्या प्रकार समोर आला. 26 फेब्रुवारीच्या संध्याकाळी ही व्यक्ती पार्लेमध्ये एका पूलावर दिसल्यावर हा प्रकार प्रकाशझोकात आला आहे. या व्यक्तीचं नाव अनिरूद्ध नायर आहे. तो विलेपार्ले येथील आंबेवाडी भागात राहतो. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पीडीत तरूणाचा वाद झाल्यानंतर त्याच्या पोटात कात्र्या खुपसल्या गेल्या होत्या. अनिरूद्ध ने पोटात कात्री खुपल्याच्या अवस्थेमध्येही मित्राकडून मदत मिळवली आणि अनिरूद्धच्या मित्राने त्याला हॉस्पिटल मध्ये नेले.

दरम्यान Aslam Hashmi नामक व्यक्तीशी अनिरूद्धचा वाद झाला होता. दारूच्या नशेमध्ये अस्लम बेफाम झाला होता. वादामधून पुढे थेट हाणामारी झाली. त्यामध्येच त्याने अनिरूद्धच्या पोटात कात्र्या घुसवल्या. पार्ले पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, ' सोमवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास कामावरून तो परतत असताना हाश्मीने त्याला स्कायवॉकवर गाठलं. पोटात कात्री खुपसली. यानंतर पोटाला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेमध्येही अनिरूद्धने मित्राला फोन करून त्याची मदत मागितली. त्यानंतर त्याला सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.

जखमा गंभीर असल्याचं बघून हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांना कळवले. या प्रकरणी पोलिसांनी कलम 307, 504,506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी हश्मीला अटक केली आहे. हल्ल्याच्या एक दिवस आधी अनिरूद्ध आणि हाश्मी मध्ये वाद झाला होता. दुसर्‍या दिवशी हाश्मीने त्याला रस्त्यात गाठून त्याच्यावर हल्ला केला.

नवी मुंबईतील एका दुसर्‍या घटनेत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या फूड जॉइंट्समधून दोन बालमजुरांची सुटका केली. मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी नियमित तपासणी दरम्यान, वाशी परिसरातील भाजी मंडईत असलेल्या दोन भोजनालयात मुले कामावर असल्याचे पोलिसांना आढळले.