Sharad Pawar Party Symbol: 'वाजवा तुतारी हटवा गद्दारी', शरद पवार यांच्या निवडणूक चिन्हाचा सोशल मीडियावर आवाज, सुप्रिया सुळे यांनी सांगितली त्रिसूत्री
'तुतारी फुंकणारा माणूस' (Man blowing Turha) असे हे पक्षचिन्ह आहे. ज्याचे पक्ष आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाला (NCP) भारतीय निवडणूक आयोग द्वारा नवे निवडूक चिन्ह (Election Symbol) प्राप्त झाले आहे. 'तुतारी फुंकणारा माणूस' (Man blowing Turha) असे हे पक्षचिन्ह आहे. ज्याचे पक्ष आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे. सोशल मीडियावरही शरद पवार यांची तुतारी (Turha) जांगलीच लोकप्रिय झाली असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील 'महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत' असे म्हणत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरुन नव्या पक्षचिन्हाचे स्वागत केले आहे आणि कार्यकर्त्यांसह जनतेलाही संदेश दिला आहे.
त्रिसूत्रीचा अवलंब करत फुंकणार तुतारी
सुप्रिया सुळे यांनी आपल्या 'X' हँडलवरुन दीर्घ पोस्ट लिहीत म्हटले आहे की, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाला 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. ही तुतारी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देते. महाराष्ट्राला झुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'महाराष्ट्रद्रोही' प्रवृत्ती, तरुणांचे रोजगार शेजारच्या राज्याच्या झोळीत अलगद नेऊन टाकणारे आणि राज्याचा सामाजिक सलोखा ढळावा यासाठी सतत काम करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात संघर्ष करण्याची हाक ही तुतारी देते. मायबाप जनतेची सेवा, कष्टकरी शेतकरी आणि महिलांचा सन्मान व महाराष्ट्राचा स्वाभिमान या त्रिसूत्रीचा अवलंब करुन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. (हेही वाचा, Jayant Patil On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार संपर्कात? जयंत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण)
'वाजवा तुतारी हटवा गद्दारी'
गजाभाऊ या नावाने चालवल्या जाणाऱ्या @gajbhau या X हँडलने 'वाजवा तुतारी हटवा गद्दारी' असे म्हणत शरद पवार यांच्या पक्षाला पाठींबा दर्शवला आहे.
एक्स पोस्ट
एक्स पोस्ट
तुतारी - कोणतेही शुभ कार्याची सुरवात
दिनेश जैन नावाच्या @JainDenesh एक्स हँडलने हाताचा पंजा (काँग्रेस) मशाल (शिवसेना (UBT), तुतारी (राष्टवादी काँग्रेस शरद पवार) आणि कमळ (भाजप) चिन्हाची तुलना आणि वैशिष्ट्ये सांगीतली आहेत. यामध्ये तुतारी म्हणजे शुभकार्याची सुरुवात असे म्हटले आहे.
सुप्रिया सुळे एक्स पोस्ट
गद्दारांविरोधात तुतारीचे रणशिंग
संकल्प श्रीवास्तव यांनी @SankalppSpeaks शरद पवार तुतारी वाजवून रणशिंग फुंकणार सोबतच हातात मशाल घेऊन काँग्रेस आणि शिवसेना (UBT) गद्दार आणि गद्दारीचा इतिहास जाळणार अशा आशयाची पोस्ट केली आहे.
एक्स पोस्ट
दरम्यान, शरद पवार गटाचे जयंत पाटील, आमदार राहित पवार, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, यांच्याह इतरही अनेक नेत्यांनी तुतारी या चिन्हाचे स्वागत केले आहे. सोशल मीडिया आणि प्रत्यक्षातही तुतारीचा प्रचार जोरात सुरु केला असून जनतेलाही अवाहन केले आहे. अर्थात, आगामी निवडणुकीत जनता तुतारीला किती आपलेसे करते ते निकालानंतरच स्पष्ट करणार आहे.