IPL Auction 2025 Live

डॉक्टर मारहाण प्रकरणी मालेगावचे एमआयएएम आमदार ईस्माइल शेख यांच्यावर गुन्हा दाखल

त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. तसेच, जोपर्यंत आमदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काम सुरु करणार नाही. अशी भूमिकाही घेतली. त्यानंतर आमदारावर गुन्हा दाखल केरण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

Beating | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

डॉक्टर मारहाण प्रकरणी (Doctor Beating Case) मालेगव ((Malegaon) येथील एआयएमआयएम (AIMIM ) आमदार ईस्माइल शेख (MLA Ismail Sheikh) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका नातेवाईकाला डिस्चार्ज देण्यावरुन आमदाराचे नातेवाईक, समर्थकांनी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital Malegaon) गोंधळ घातला. रुग्णाला डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टरवर दबाव टाकला. डिस्चार्ज देण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याने आमदारांच्या समर्थकांनी रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

टीव्ही 9 या वृत्तवाहिणीने दिलेल्या वृत्तानुसार, आमदार इस्माईल शेख यांनी काल रात्री रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना अनेकदा फोन केला होता. रुग्णाची चौकशी करण्यासाठी आमदारांनी फोन केला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी फोन स्वीकारला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येत डॉक्टरांना धक्काबुक्की केली.

डॉक्टरांना धक्काबुक्की झाल्याने रुग्णालयातील सर्वच डॉक्टर आणि कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. तसेच, जोपर्यंत आमदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काम सुरु करणार नाही. अशी भूमिकाही घेतली. त्यानंतर आमदारावर गुन्हा दाखल केरण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. (हेही वाचा, बीड: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घराबाहेर थांबण्यास विरोध केल्याने पोलिसांना टोळक्याकडून मारहाण)

दरम्यान, कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरु असल्याने राज्यासह देशात लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर, पोलीस अथवा सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उगाराल तर याद राखा. लष्कराला पाचारण करण्याची वेळ आणू नका, असे अवाहन आणि इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.