Malad Suicide Case: 3 जुन्या सहकार्‍यांच्या धमकीने दबावाखाली असलेल्या 22 वर्षीय तरूणाने केली आत्महत्या

आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्याविरूद्ध आहे.

Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

जुन्या सहकाऱ्यांच्या धमक्यांना तोंड देऊ न शकल्याने 22 वर्षीय चंद्रेशकुमार तिवारी या तरूणाने मालाड पूर्व, मुंबई येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिवारी ने नुकताच त्याचा जॉब बदलला होता. दरम्यान त्याने इंस्टावर पोस्ट करत आपल्याला जुने सहकारी त्रास देत असल्याची माहिती देणारा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. दरम्यान त्याचा मृतदेह हाती आल्या नंतर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Free Press Journal,च्या माहितीनुसार, तिवारी हा Tata Play मधून Airtel मध्ये आला होता. तो senior sales executive म्हणून काम करत होता. जुना जॉब सोडल्यानंतर त्याला धमक्या मिळत होत्या. ज्यात सदानंद कदम, परेश शेट्टी, दीपक विश्वकर्मा यांचा समावेश आहे. तिवारीला धमकी देताना ते त्याला शहरात काम मिळणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं म्हणाले होते. यामुळे तिवारी वर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. Thane Shocker: ठाण्यातील उच्चभ्रू इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून उडी मारून 45 वर्षीय महिलेची आत्महत्या .

Times of India च्या वृत्तानुसार, तिवारी चं कुटुंब शहराबाहेर होते. 29 ऑक्टोबर रोजी त्यांनी दोन दिवसांची सिक लिव्ह घेतली होती. 30 ऑक्टोबर रोजी त्याचा भाऊ पवन त्याच्याशी फोन करून संपर्क करू शकला नाही, तेव्हा त्याने तिवारीची तपासणी करण्यासाठी त्यांचे मामा संतोष शुक्ला यांच्याशी संपर्क साधला. शुक्ला यांनी घराचं दार तोडून घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना तो लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसला. मृतावस्थेमध्ये त्याला पाहून तातडीने  शताब्दी रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. नंतर 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास पोस्ट केलेला चंद्रेशचा शेवटचा इंस्टाग्राम व्हिडिओ कुटुंबाला आढळला. ज्यात त्याच्यावर तिघांचा दबाव असल्याचं समजलं.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif