Makar Sankranti 2022: ओमिक्रॉन दहशतीच्या पार्श्वभूमी वर देहू, आळंदी मधील माऊली, संत तुकरामाचं मंदिर राहणार भाविकांसाठी बंद
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी कडून माऊलींचे संजीवन समाधी मंदिर गुरुवार 13 जानेवारी पासून शनिवार 15 जानेवारीपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉन वायरसची (Omicron Variant) वाढती दहशत पाहता प्रशासन अलर्ट मोड वर येऊन काम करत आहे. राज्यात कडक लॉकडाऊन नसला तरीही अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी निर्बंध मात्र कडक करण्यात आले आहेत. पुण्यातही वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर येत्या मकार संक्रांतीच्या (Makar Sankranti) सणाला संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर (Sant Dnyaneshwar Maharaj Temple) आणि देहू मधील संत तुकाराम महाराज मंदिर (Sant Tukaram Maharaj Temple) देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी संक्रांतीच्या निमित्ताने भाविक आळंदीला आणि देहूला संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांना ओवसा करण्यासाठी येतात. पण यावर्षी या परंपरेमध्ये खंड पडणार आहे. हे देखील नक्की वाचा: Makar Sankranti: मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या इतिहास .
देवस्थान प्रशासनाने भाविकांची गर्दी टाळण्यासाठी 14 जानेवारी अर्थात मकर संक्रांती दिवशी पहाटे 5 ते रात्री 8 या दरम्यान मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देहू मध्येही कोरोनाची साखळी मोडण्यासाठी भाविकांनी देहू मध्ये न येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे भाविकांना संक्रांती दिवशी विठ्ठल रूक्मिणी, तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांचं दर्शन घेता येत नाही. हे देखील नक्की वाचा: Omicron Scare: सातारा मधील मांढरदेव येथील काळूबाई देवीची, सुरूर येथील धावजीबुवा यांची वार्षिक यात्रा रद्द .
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी कडून माऊलींचे संजीवन समाधी मंदिर गुरुवार 13 जानेवारी पासून शनिवार 15 जानेवारीपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयीची माहिती संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली आहे.