Pune Traffic: गणपती विसर्जननिमित्त पुणे वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
गणेश विसर्जनाला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यानिमित्ताने गणेश मंडळाकडून संपूर्ण बंदोबस्त करण्यात आला आहे. गणपती पाहण्यासाठी लोकांनी अलोट गर्दी केली आहे.
Pune Traffic: पुणे शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणपती विसर्जनाला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यानिमित्ताने गणेश मंडळाकडून संपूर्ण बंदोबस्त करण्यात आला आहे. गणपती पाहण्यासाठी लोकांनी अलोट गर्दी केली आहे. आता गणपती विसर्जनादिवशी देखील शहरात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांकडून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. याचनिमित्ताने वाहतूक पोलिसांकडून वाहतूकीत बदल करण्यात आले आहे. (हेही वाचा- लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेला आली फीट, पोलिसांनी उचलून रुग्णालयात केलं दाखल, Video Viral)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मध्यभागातील १७ प्रमुख रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विसर्जनाची मिरवणूकीची सांगता झाल्यानंतर हे १७ प्रमुख रस्ते खुले करण्यात येतील. विसर्जनची सुरुवात मंगळवारी सकाळी १०.३०च्या सुमारास होणार आहे. विसर्जन पूर्वीच पुणेकरांनी हे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
मंगळवारी विसर्जन मिरवणूक सुरु होण्यापूर्वी हे मार्ग राहतील बंद
लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, भांडरकर रस्ता, पुणे सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरु नानक, फर्ग्यूसन रस्ता, गणेश रस्ता हे पुढील रस्ते बंद राहतील अशी माहिती वाहतुक पोलिसांकडून मिळाली आहे.