Majhi Ladki Bahin Yojana Online Registration Process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे, नोंदणी, निकष आणि अर्ज कसा करावा? घ्या जाणून

म्हणूनच या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, नोंदणी, पात्रता निकष आणि इतर सर्व बाबींची माहिती (Majhi Ladki Bahin Yojana Online Registration Process) येथे दिली आहे. ज्यामुळे आपणास योजनेचा लाभ घेणे सुलभ होऊ शकते.

Majhi Ladki Bahin Yojana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) नुकतीच सुरु केली. या योजनेचा लाभ राज्यभरातील अनेक महिलांना होईल, असा दावा राज्य सरकार करते आहे. दरम्यान, आपणही महिला असाल किंवा आपल्या कुटुंबातील महिलेस या योजनेचा लाभ मिळवून देऊ इच्छित असाल तर, या योजनेबाबत संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, नोंदणी, पात्रता निकष आणि इतर सर्व बाबींची माहिती (Majhi Ladki Bahin Yojana Online Registration Process) येथे दिली आहे. ज्यामुळे आपणास योजनेचा लाभ घेणे सुलभ होऊ शकते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे?

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे राज्य सरकार या योजनेंतर्गत योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये देणार आहे. यासाठी 21 ते 60 या वयोगटातील महिला पात्र असणार आहेत. मात्र, अट अशी की, योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांहून अधिक नसावे. लाभार्थी महिलां त्यांच्या नजिकच्या महा- इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. (हेही वाचा, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिलांना दरमहा मिळणार पैसे; 90 ते 95 लाख महिलांना होणार लाभ)

लाडकी बहीण योजना पात्रता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे

आधार कार्ट, राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, हमीपत्र (योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबत), अर्जदाराची (महिला) प्रत्यक्ष उपस्थिती (हेही वाचा, Maharashtra Budget 2023: 'लेक लाडकी' योजना ते आशा स्वयंसेविकाच्या मानधनात वाढ; पहा महिलांसाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कोठे दाखल कराल?

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही पात्र महिलेस ऑनलाईन संकेतस्थळ किंवा प्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे अर्ज दाखल करता येणार आहे. अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत, महापालिका प्रभाग कार्यालय, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे आदि. ठिकाणी हा अर्ज करता येईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रक्रिया

या यजनेसाठी 1 जुलैपासून राज्यभरात कोठेही अर्ज दाखल करता येऊ शकेल. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 15 जुलै असणार आहे. अर्ज दाखल झाल्यावर 16 ते 20 जुलै या कालावधीत प्रारुप यादी प्रकाशित केली जाईल. ही यादी प्रकाशित होताच त्यावर 21 ते 30 जुलै या काळात हरकत, तक्रार यांचे निरसन करु अंतिम लाभार्थी निवड यादी 1 ऑगस्ट रोजी प्रकाशित केली जाईल.

मध्य प्रदेश राज्य सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही विद्यमान सरकार ही योजना लागू करु पाहते आहे. या योजनेला राज्यातील महिलांकडून कसा प्रतिसाद मिळतो याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.