पालघर खासदार राजेंद्र गावित यांना बदनाम करणाऱ्या टोळीला धडा शिकवणार - महिला रक्षक परिषद महाराष्ट्र राज्य
समाजांमध्ये हनी ट्रॅप सारख्या प्रकार करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकाव्यात अशी मागणी महिला रक्षक परिषदेने केली आहे.
पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांच्यावर मीरा रोड पोलीस ठाणे (Mira Road Police Station) मध्ये कथित विनयभंगाची खोटी तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा दावा करत महिला रक्षक परिषदेने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ही तक्रार सूडापोटी राजकीय लोकांशी संगनमत करून राजकीय हेतूने केल्याचं त्यांचं म्हणणंं आहे.
मीरा रोड येथे राजेंद्र गावित यांची भारत गॅस एजन्सी आहे. या एजन्सीमध्ये काम करणाऱ्या मॅनेजर कॉम्प्युटर ऑपरेटर व बुकिंग क्लार्क या पदावरील 3 व्यक्ती काम करत असताना त्यांनी गॅस सिलेंडर मध्ये खूप मोठा काळाबाजार या गॅस एजन्सी मध्ये चालवला होता.अंदाजे एक कोटीच्या वर अफरा तफर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राजेंद्र गावित यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या त्रिकुटा वर नजर ठेवली व त्यांना रंगेहाथ पकडले. त्याची रीतसर तक्रार 26 नोव्हेंबर रोजी मीरारोड स्थानिक पोलीस ठाणे येथे देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला व त्या त्रिकुटाला सहा दिवस पोलीस कस्टडी करण्यात आली होती. नंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
दरम्यान यानंतर एका महिला कर्मचारीने तिच्यावर गुन्हा दाखल झाला या गोष्टीचा राग मनात धरून राजेंद्र गावित यांचे राजकीय विरोधक यांच्याशी संगनमत करून एक षडयंत्र रचले आणि राजकीय विरोधकांची मदत घेऊन त्यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. या महिलेचा वापर करून राजकीय विरोधक राजेंद्र गावित यांची प्रतिमा समाजामध्ये मलीन करीत आहेत. हे चित्र स्पष्ट झाले आहे.
ज्या राजकीय नेत्यांनी तक्रारदार महिलेला हाताशी धरून या खोट्या तक्रारी केल्या आहेत. त्या नेत्यांची पार्श्वभूमी पोलिसांनी तपासावी व त्या नेत्यांचे महिला बाबत असलेले मागील कारनामे त्यांच्यावर असलेल्या आरोप ते पोलिसांनी बघावे अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे. खासदार राजेंद्र गावित यांची बातमी मीडियामधून समजल्यावर महिला रक्षक परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेने या घटनेची दखल घेतली.महिला रक्षक परिषद ही संघटना महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर काम करते. महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आहे.परंतु एखाद्या महिलेने सूडापोटी राजकीय लोकांशी संगनमत करून राजकीय हेतूने महिला असल्याचा गैरफायदा उचलून जर कोणा पुरुषा विरुद्ध खोट्या तक्रारी देऊन कुठे गुन्हे दाखल करीत असेल. तर अशा महिलांचे समर्थन महिला रक्षक परिषद कदापि करणार नाही. उलट त्या महिलेने ज्यांच्या विरुद्ध खोटी तक्रार दिली आहे.त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सत्य समाजा समोर आणण्याचे काम महिला रक्षक परिषद करीत आहे असे सांगण्यात आले आहे.
महिला रक्षक परिषदेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,गृहमंत्री अनिल देशमुख व मीरारोड पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे. की सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून तक्रारदार महिलेची नार्को टेस्ट करून त्यांना मदत करणाऱ्या राजकीय लोकांची नावे बाहेर काढावी व चुकीचे काम करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. समाजांमध्ये हनी ट्रॅप सारख्या प्रकार करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकाव्यात अशी मागणी महिला रक्षक परिषदेने केली आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघातील जनतेची मान खाली जाईल असे कृत्य माझ्याकडून कदापि होणार नाही असे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले आहे.