Mahavitaran Tariff Hike: नविनवर्षाच्या मुहूर्तावर राज्यातील नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता, जाणून घ्या प्रति युनिट नवे दर

सध्याचा वीज युनिट दर ७५ पैसे एवढा आहे तरी पुढील काहीचं दिवसात म्हणजे नव्या दरानुसार हा दर १ रुपया तीस पैसे होणार आहे.

Representational Image (Photo credits: PTI)

सध्या सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसताना दिसतात. कुठलीही वस्तु विकत घ्यायचा विचार केला तरी त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. पेट्रोल, डिझेल, अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत वस्तुंसाठी नागरीकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. तरी आता वाढीव वीजदराच्या किमतीमुळे राज्यातील नागरिकांना शॉक बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   येत्या आर्थिक वर्षापासून महावितरण वीज प्रति युनिट दर वाढवणार आहे, अशी माहिती मिळत आहे. सध्याचा वीज युनिट दर ७५ पैसे एवढा आहे तरी पुढील काहीचं दिवसात म्हणजे नव्या दरानुसार हा दर १ रुपया तीस पैसे होणार आहे. म्हणजेचं तब्बल ७५ पैसे प्रति युनिट वीज दर वाढवण्याच्या विचारात महावितरण आहे. येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. महावितरणाच्या गळतीमुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचं महावितरणाकडून सांगण्यात आले आहे.

 

वीज चोरी, थकीत वीज बिलामुळे महावितरण हा निर्णय घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महावितरण कंपनीकडून राज्य नियामक आयोगाकडे वीजदरवाढीसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. पण अजून तरी या याचिकेवर नियामक आयोगाने कुठलाही निर्णय दिलेला नाही. तसेच महावितरणाच्या वीज दरवाढीच्या या याचिकेस  नियामक आयोगाने परवानगी दिल्यास नवे वीजदर पुढील आर्थिक वर्ष म्हणजे १ मार्च २०२३ पासून लागू होती. तरी या नव्या वीजदर वाढीचा शहरी आणि ग्रामीण भागात फरक पडेल. (हे ही वाचा:- देशातील सहावी Vande Bharat Train बिलासपूर ते नागपूर दरम्यान धावणार, PM Narendra Modi 11 डिसेंबर रोजी करणार उद्घाटन)

 

दूरगामी परिणाम राज्यातील सर्व ग्राहकांच्या वर होणार आहेत. राज्यातील सर्व वीज ग्राहकांनी प्रचंड संख्येने सूचना व हरकती नोंदवून करावे, असे आवाहन वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे यांनी यानिमित्ताने केले आहे. सगळ्याचं वस्तु महागल्या असताना वीज दरवाढीचा फटका राज्यातील नागरिकांना बसणार आहे. तरी १ मार्चपासून राज्यातील नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.