Ramesh Chennithala Meets Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, जागावाटपावर केली चर्चा
मुंबईमधील दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांसाठी काँग्रेस आग्रही आहे. शिवसेना ठाकरे गट मुंबईतील सहापैकी चार जागांवर आग्रही आहे.
लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर असतानाही महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) अजूनही जागावाटप झालेली नाही आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. राज्यातील जागावाटपामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आठ जागांवर आग्रही आहेत. महाविकास आघाडीकडून जागावाटपावर बोलणी होत असली, तरी त्यामध्ये अजून कोणत्याही पद्धतीचा फॉर्मुला निश्चित करण्यात आलेला नाही. (हेही वाचा - Cm Eknath Shinde: एकनाथ शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसऱ्या क्रमांकावर; Mood of The Nation सर्वेत केवळ 1.9 टक्के लोकांची पसंती)
मुंबईमधील दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांसाठी काँग्रेस आग्रही आहे. शिवसेना ठाकरे गट मुंबईतील सहापैकी चार जागांवर आग्रही आहे. त्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई जागांचा समावेश आहे. काँग्रेस अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी आग्रही आहे तसेच उद्धव ठाकरे गट देखील आपल्याला अधिक जागा मिळाव्या यासाठी प्रयत्नशील आहे.
सध्या महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी सुद्धा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले, तरी वंचितकडून येत असलेल्या अटी शर्तींमुळे सन्मानजक तोडगा निघालेला नाही.
(The above story first appeared on LatestLY on Feb 10, 2024 05:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

