Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, ठळक घडामोडी
धुळे (Dhule), नंदुरबार (Nagpur), अकोला (Akola), वाशीम (Washim), पालघर (Palghar) आणि नागपूर (Nagpur) जिल्हा परिषद (Zilla Parishad Election Results 2021) आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीसाठी (Panchayat Samiti Election Results 2021) झालेल्या निवडणूक मतदानाचा मतमोजणी निकाल जाहीर होऊ लागले आहेत.
धुळे (Dhule), नंदुरबार (Nagpur), अकोला (Akola), वाशीम (Washim), पालघर (Palghar) आणि नागपूर (Nagpur) जिल्हा परिषद (Zilla Parishad Election Results 2021) आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीसाठी (Panchayat Samiti Election Results 2021) झालेल्या निवडणूक मतदानाचा मतमोजणी निकाल जाहीर होऊ लागले आहेत. काही ठिकाणी अपेक्षीत तर काही ठिकाणी अनपेक्षीत निकाल पाहायला मिळत आहेत. निकालाबाबत आतापर्यंत हाती आलेल्या 10 महत्त्वाच्या घडामोडी घ्या जाणून.
अनिल देशमुखांना धक्का
अनिल देशमुख यांचे बलस्थान म्हणून ओळखली जाणारी नरखेड पंचायत समिती (Narkhed Panchayat Samiti) भाजपच्या ताब्यात गेली आहे. अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा होता. मात्र ईडीची चौकशी पाठी लागल्यापासून अनिल देशमुख हे गायब आहेत. त्यामुळे पंचायत समितीच नव्हे तर जिल्हा परिषद निवडणूक प्रचारातही ते सक्रीय नव्हते. परिणामी राष्ट्रवादीला इथे मोठा झटका बसला. (हेही वाचा, Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021: धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, पालघर, नागपूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आज मतमोजणी)
अकोला पंचायत समिती
चारपैकी दोन जागांवर वंचितचा विजय . अद्यापही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आघाडीवर
घुसर जिल्हा परिषद
घुसर जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या शंकरराव इंगळे यांनी बाजी मारली आहे. विकास पागृत यांचा 400 मतांनी पराभव करुन ते विजयी झाले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कन्या विजयी
धुळे जिल्हा परिषदेत भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उर्फ सी.आर पाटील यांच्या कन्या धरती देवरे विजयी झाल्या आहेत.
दरम्यान, राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेत आहे. त्यामुळे हीच आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, राज्यात महाविकासआघाडी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र वेगळे लढण्याचा निर्णय आघाडीतील घटकपक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. त्यामुळे काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर सामना पाहायला मिळत आहे. राज्यातील या हटके अशा समिकरणाला जनता कशी दाद देते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2021 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

