नागपूर: जगातील सर्वात बुटकी महिला ज्योति आम्गे कोरोना व्हायरस बाबत जनजागृतीसाठी पोलिसांच्या मदतील!

यामध्ये सध्या नागपूर शहर कोरोनाबाधितांच्या यादीमध्ये रेड झोनमध्ये असून तेथे 39 रूग्ण आहेत.

Jyoti Amge । Photo Credits: Twitter/ ANI

जगातील सर्वात बुटकी महिला म्हणून नोंद असलेली ज्योती आमगे (Jyoti Amge)सोमवार (13 एप्रिल) दिवशी नागपुरमध्ये रस्त्यावर उतरून लोकांना कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान घरातच राहण्याचं आवाहन करताना दिसली. दरम्यान या कोरोना व्हायरसचं संकट परतवण्यासाठी अद्याप औषध किंवा लस नसल्याने आता सोशल डिस्टन्सिंग पाळतच नागरिकांना घरामध्येच सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहेत. मात्र नागरिकांमध्ये याबाबत अजूनही गांभीर्य नसल्याने ज्योतीने नागरिकांना समाजात सजगता वाढवण्यासाठी बाहेर पडण्याचा मार्ग निवडला आहे. तिने काल नागपूरच्या मदतीने नागरिकांना वारंवार हात धुणे, चेहर्‍यावर मास्क लावणं, हातात ग्लोव्ह्स घालण्याचं महत्त्व पटवून दिलं आहे.

AFP या जागतिक वृत्त संस्थेशी बोलताना तिने दिलेल्या माहितीनुसार,' कोरोनाचा सामना करण्यासाठी आपले पोलिस दल, आरोग्य यंत्रणा, मिलिटरी ऑफिसर पुढाकार घेत आहेत. जीवघेण्या व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशावेळेस माझं कर्तव्य म्हणून मी नागरिकांना कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी social distancing पाळण्याचं आवाहन करण्यासाठी बाहेर पडली आहे. दरम्यान ज्योती 26 वर्षीय असून तिची उंची 62.8 सेमी इतकी आहे. याबबातची Guinness World Records मध्ये नोंद देखील करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेल्या भारतामध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आहेत. यामध्ये सध्या नागपूर शहर कोरोनाबाधितांच्या यादीमध्ये रेड झोनमध्ये असून तेथे 39 रूग्ण आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif