Woman Dies After Acid Attack: बीड हादरले! अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळलेल्या त्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

सध्या आरोपी अद्याप फरार असून त्याला पकडण्यासाठी बीड पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. तसेच या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशा मागणींनी आता जोर धरला आहे.

Representational Image (Photo Credit: File Image)

Woman dies after acid attack by boyfriend: बीड (Beed) जिल्ह्यातील येळंब घाट येथे एका तरूणाने आपल्या प्रेयसीवर अॅसिड आणि पेट्रोल टाकून जिंवत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या पीडित तरूणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरूणी पुण्याहून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. दरम्यान, या तरुणीचा आवाज ऐकल्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान या पीडित तरूणीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रियकरांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथे राहत असलेले दोन प्रेमी युगल गावाकडे जात होते. मात्र, बीडच्या येळम्ब परिसरात दोघात वाद झाला. गावी परतत असताना पहाटे 3 च्या दरम्यान बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी त्याने गाडी थांबवली. त्यावेळी प्रियकराने रागाच्या भरात चक्क प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला केला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरूणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. दरम्यान, पीडितेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातून जाणारे नागरिक तिच्या मदतीला धावले आणि बीडच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा-Kondaibari Ghat Accident: कोंडाईबारी घाटात ट्रकच्या धडकेनंतर स्विफ्ट कार 35 फुट खोल दरीत कोळसली; 3 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

 मृत्यूपूर्वी पीडितेने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी आरोपीविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी अद्याप फरार असून त्याला पकडण्यासाठी बीड पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. तसेच या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशा मागणींनी आता जोर धरला आहे.