Cold (File Photo: IANS)

उत्तर भारतामधील थंडीच्या कडाक्याचा प्रभाव आता महाराष्ट्रामध्येही दिसायला सुरूवात झाली आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिक सह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही थंडी जाणवायला सुरूवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी वातावरणात किमान तापमान हे एक अंकी झाले आहे. सध्या परभणी मध्ये किमान तापमान नीचांकी आहे. परभणीत पारा 5.6 अंशपर्यंत खाली घसरला आहे. त्यापाठोपाठ गोंदिया, नागपूर, वर्धा या विदर्भ भागातही वातावरण थंड झाले आहे. मुंबई हवामानखात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तास वातावरणामध्ये अशाचप्रकारे गारवा राहिल.

मुंबई मध्ये देखील मागील काही दिवस थंडी जाणवत आहे. मुंबई शहराचं किमान तापमान 18 अंश आहे. तर उपनगरांमध्ये ते 18 पेक्षा कमी काही ठिकाणी नोंदवण्यात आले आहे. मुंबईकरांची आजची पहाट निरभ्र झाली आहे. पण राज्यात काही ठिकाणी पहाटे धुकं पहायला मिळत आहे.

आजचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील तापमान

गोंदिया: 7 अंश

नागपूर: 8.4 अंश

वर्धा: 9.8 अंश

अकोला: 9.6 अंश

पुणे: 9.2 अंश

नाशिक: 9.1 अंश

औरंगाबाद: 9.5 अंश

बारामती: 9.2 अंश

जळगाव: 10.5 अंश

मालेगाव: 10.8 अंश

अमरावती:11.1 अंश

चंद्रपूर: 10 अंश

बुलढाणा: 11.4 अंश

मुंबई: 18 अंश

हवामान खात्याने वर्तावलेल्या अंदाजानुसार, शीतलहरीची परिस्थिती मध्य भारतात आजपासून कमी होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये सुरू रहाणार आहे. यंदा राजस्थान मध्येही थंडीचा कहर पहायला मिळाला आहे. तेथील तापमान उणे आहे. माऊंट अबू या राजस्थानातील हिल स्टेशनवर उणे 1, 2 अंश तापमान असल्याने पर्यटकांना तिथे मनाली प्रमाणे बर्फ अनुभवता येत असल्याचं काहींचं म्हणणं आहे.