Door-To-Door Vaccination in Maharashtra: राज्यात लवकरच घरोघरी लसीकरणाला सुरुवात; ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात लवकरच घरोघरी लसीकरण सुरु होणार आहे. यासंबंधीची माहिती राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात दिली.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोविड-19 संकटाच्या (Covid-19 Pandemic) पार्श्वभूमीवर एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. राज्यात लवकरच घरोघरी लसीकरण (Door-To-Door Vaccination) सुरु होणार आहे. यासंबंधीची माहिती राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) दिली. तसंच याची सुरुवात पुण्यापासून (Pune) करण्यात येणार असून यासाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नसल्याचेही सरकारने म्हटले आहे.  ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेल्या आणि आजारी नागरिकांचे घरोघरी लसीकरण करण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Door-to-Door Vaccination: घरोघरी जावून लस देणारं 'हे' ठरलं देशातील पहिलं शहर)

घरोघरी जावून लसीकरण करण्याला केंद्र सरकारचा सुरुवातीपासूनच विरोध होता. यावरुन मुंबई हायकोर्टाने केंद्राला फटकारले होते. तसंच घरोघरी लसीकरणाचा कार्यक्रम तयार असताना केंद्र सरकराच्या मंजुरीची गरज काय? केरळ, बिहार, झारखंडने परवानगी घेतली होती का? असे प्रश्नही राज्य सरकारला हायकोर्टाकडून काल विचारण्यात आले होते. त्याचबरोबर घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारने अंतिम टप्प्यात माघार घेतल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त करत बुधवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज राज्य सरकारने केंद्राच्या परवानगीशिवाय घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. (घरोघरी लसीकरण केल्याने अनेक जेष्ठांचे प्राण वाचले असते; मुंबई हायकोर्टाचे केंद्र सरकारला खडे बोल)

Bar & Bench Tweet:

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिमेच्या अनुभवावरुन घरोघरी लसीकरण मोहिम राबवण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलं. याच अनुभवाच्या जोरावर आणि जिल्ह्याचा  मध्यम आकार यामुळे घरोघरी लसीकरणाचा मोहिम पुण्यापासून सुरु करणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलं.

दरम्यान, घरोघरी लसीकरण मोहिमेसाठी लवकरच राज्य सरकारकडून ई-मेल आयडी प्रसिद्ध केला जाईल. लसीची आवश्यकता असणाऱ्या कुटुंबियांनी ई-मेलद्वारे नोंदणी करावी, असं सांगण्यात आलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif