महाराष्ट्र्रातील 34 जिल्ह्यांच्या रस्ते विकासासाठी 20 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर, 2100 किमी रस्त्याचे प्लॅनिंग सुरु
महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये रस्त्यांच्या विकासासाठी आज, 9 सप्टेंबर रोजी राज्य सरकार (Maharashtra State Government) व द एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (The Asian Development Bank) वतीने 200 मिलियन म्हणजेच 20 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे ADB बँकेचे अतिरिक्त सचिव समीर कुमार खरे, अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभाग अधिकारी, व ADB चे निवासी उप-राष्ट्रीय संचालक सब्यसाची मित्रा यांच्या उपस्थितीत आज या कर्जमंजुरीच्या कराराला समंती देण्यात आली. या निधीतून राज्यात ग्राम विकास योजनेच्या (MRRDA) अंतर्गत सर्व रस्त्यांची डागडुजी व बांधकामाची कामे करण्यात येतील, जेणेकरून रस्ते वाहतूक सुरक्षा, बाजार व अन्य सुविधांशी जोडणी या दृष्टीने प्रगती होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र ग्राम विकास योजनेच्या अंतर्गत तब्बल 2100 किमी अंतराच्या रस्त्यांचा विकास करण्यासाठी या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित क्षेत्रातील हवामानाशी निगडित बाबींचा आढावा घेत रस्ते वाहतुकीत सुरक्षेचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच ग्रामीण भाग व शेतबाजाराच्या ठिकाणांना जोडण्यात येईल यातून खेडयातील रहिवाश्यांना आर्थिक कामात साह्यता होईल अशी अपेक्षा मित्रा यांनी व्यक्त केली आहे. (Mumbai Rains Traffic Update: नागरिकांचा खोळंबा टाळण्यासाठी मुंबईतील BEST BUS मार्गात बदल)
दरम्यान महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभागाला सोबतच पाच वर्षांसाठीचा कंत्राटी देखभालीची अटीवर तांत्रिक कामासाठी देखील अतिरिक्त 1 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला देखील मान्यता मिळाली आहे. यामार्फ़त रस्त्यांची सुरक्षा, हवामान पूरक रस्ते बांधणी व ऑनलाईन प्रणालीवर आधारित देखरेखीचे काम करण्यात येणार आहे.