Maharashtra Mission Begin Again अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घ्या
मार्च ते मे महिन्यापर्यंतच्या कडक लॉकडाऊननंतर जून महिन्यापासून अनलॉकिंगला सुरुवात झाली. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात राज्यात काय सुरु राहणार आणि काय बंद जाणून घेऊया...
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) हळूहळू शिथिल होत आहे. मार्च ते मे महिन्यापर्यंतच्या कडक लॉकडाऊननंतर जून महिन्यापासून अनलॉकिंगला सुरुवात झाली. त्यानंतर अनलॉक (Unlock) च्या माध्यमातून टप्प्याटप्याने व्यवसाय, उद्योगधंदे, इतर सेवा, सुविधा पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. राज्यातील लॉकडाऊन 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवला असला तरी कालपासून सिनेमा हॉल, नाट्यगृहं, मल्टिप्लेक्स खुली करण्यात आली आहेत. त्याचबरोबर योग संस्था आणि इनडोअर्स गेम्संना देखील परवानगी देण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी काही नियमांचे पालन करणे अनिवार्यआहे. दरम्यान, राज्यात नेमकं काय सुरु आहे आणि काय बंद याबाबत नागरिकांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात राज्यात काय सुरु राहणार आणि काय बंद जाणून घेऊया....
मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भातील माहिती दिली असून मास्क घालणे, अंतर राखणे आणि हाताची स्वच्छता या तीन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची विनंती देखील नागरिकांना केली आहे. (सिनेमागृहं, थिएटर्स मध्ये कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी कशी घ्याल काळजी?)
BMC Tweet:
काय सुरु?
# योग प्रशिक्षण संस्था (कन्टेंमेंट झोन बाहेरील)
# अंतग्रेही खेळ (टेनिस, स्क्वॉश, बॅडमिंटन सारखे indoor games)
# अन्नाची घरपोच सेवा.
# अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची ई-कॉमर्स घरपोच सेवा.
# औद्योगिक उपक्रम.
# इमारतीचे बांधकाम.
# सिनेमागृहं व नाट्यगृहं (50% क्षमतेसह)
# उपहारगृहं, बार व पब (50% क्षमतेसह)
# हॉटेल.
# मॉल व खरेदी केंद्र.
# किराणा दुकाने व इतर दुकाने.
# व्यायामशाळा (जिम)
# राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या प्रशिक्षणाकरीता स्विमिंग पूल.
दरम्यान, अत्यंविधीसाठी 20 पेक्षा कमी व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. तर लग्न किंवा इतर खाजगी कार्यक्रम 50 पेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यास मुभा आहे.
काय बंद?
# सामान्य नागरिकांसाठी स्विमिंग पूल.
# प्रार्थनास्थळे, धार्मिक स्थळे.
# क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील कार्यक्रम.
# सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रम.
दिवाळीनंतर इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. तसंच सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण राज्य सुरु करण्याचे संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 चा संसर्ग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आहे. परंतु, येणाऱ्या सणासुदीच्या काळात संसर्ग वाढू नये यासाठी सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.