Maharashtra Weather Updates: मुंबईसह राज्यात पुढील 24 तास ढगाळ वातावरण कायम राहणार
यबाबात अधिक माहिती हवामान खात्याचे अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यात पुढील 24 तास ढगाळ वातावरण कायम राहाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यबाबात अधिक माहिती हवामान खात्याचे अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. राज्यात ढगाळ वातावरण सकाळ पासून दिसून येत आहे. पुणे, कोल्हापूर, गगनबावडा, सातारा, सिंधुदूर्ग, गोवा या परिसरात तुरळ पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर शुक्रवारी तापमान 28 अंश आणि किमान 25 अंश सेल्सियसने खाली आले होते.
राज्यात थंडीचा कडाका अद्याप जावणू लागला नसला तरीही सकाळच्या वेळेस ढगाळ वातावरण असते. यंदा गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी या सणांमध्येही अवकाळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. हा पाऊस कोसळण्यामागे अनेक कारणं आहेत. दरम्यान अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या वेधशाळेने म्हटले आहे.(Maharashtra Weather Updates: मुंबई सह राज्यात येत्या 22, 23 डिसेंबर दिवशी पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता; वेधशाळेचा अंदाज)
अवकाळी पावसामुळे यंदा थंडीचा काळ उशिराने सुरु होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तसेच पावसामुळे पीकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आता थंडी लांबल्याने पुन्हा राज्यात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 22 आणि 23 डिसेंबर दिवशी मुंबई सह नजीकच्या परिसरातील लोकांनी बाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊन बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे.