Maharashtra Weather Update: मुसळधार पावसासह काही ठिकाणी यलो अलर्ट; पहा महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज

मराठवाड्यासाठीही खुशखबर आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असे हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी म्हटले आहे.

Maharashtra Weather | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

हवामान विभागाने (Meteorological Department) पुन्हा एकदा महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा (Maharashtra Weather Update) दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशीरा मुसळधार पाऊस कोसळला.औरंगाबादमधील पैठण, वैजापूर, गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पवासाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून पावसासाठी अनुकुल वातावरण निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

यलो अलर्ट असलेले जिल्हे

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी आणि लातूर. या जिल्ह्यांमध्ये आज (17 ऑगस्ट) विविध ठिकाणी पर्जन्यवृष्टी होईल असे म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Updates: कोकण, मध्य महाराष्ट्रात दिवाळी नंतर हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता)

18 ऑगस्टसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे

यलो अलर्ट: रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नांदेड आणि हिंगोली

ऑरेंज अलर्ट: कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, यवतमाळ.

ट्विट

हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला आज (17 ऑगस्ट) यलो तर उद्या (18 ऑगस्ट) ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यासाठीही खुशखबर आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असे हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी म्हटले आहे.