Maharashtra Weather Update: देशात सर्वाधिक तापमान असणाऱ्या टॉप 10 यादीत महाराष्ट्रातील 'या' तीन शहरांचा समावेश, 47 अंशाहून अधिक तापमानाची नोंद
या भागात 47 अंशाहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.
Heatwave In Maharashtra: देशातील बर्याच भागात दिवसागणिक तापमान वाढत आहे. मुख्यतः पुढील 2 दिवस ही परिस्थिती कायम राहणार किंवा आणखीन भीषण होणार अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर हरियाणा (Haryana), पश्चिम मध्यप्रदेश (West MP), विदर्भ (Vidarbha) आणि राजस्थानला (Rajasthan) रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर स्कायमेट वेदर (Skymet Weather) या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी संस्थेतर्फ़े आज घडीला देशातील सर्वात उष्ण 10 शहरांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे.विदर्भातील अकोला (Akola), नागपूर (Nagpur) आणि चंद्रपूर (Chandrapur) ही तीन सर्वात अधिक तापमान असणारी शहरे आहेत. या भागात 47 अंशाहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. Mumbai Monsoon 2020 Date: मुंबईत जून च्या दुसऱ्या आठवड्यात 'या' दिवशी मान्सून दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज
स्कायमेट वेदर वेबसाईटच्या माहितीनुसार, सर्वात उष्ण शहरांच्या यादीत राजस्थान मधील चुरो हे शहर प्रथम क्रमांकावर आहे तर त्यापाठोपाठ अकोला व नागपूर या शहरांचे स्थान आहे. या यादीत सहाव्या क्रमांकावर चंद्रपूर शहराचे स्थान आहे. आज, मंगळवारी अकोल्यात 47.4 अंश सेल्सियस, नागपूर मध्ये 47 अंश सेल्सियस आणि चंद्रपुरात 46. 8 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले आहे.
भारतातील सर्वाधिक तापमान असणारी 10 शहरे
शहर | राज्य | तापमान (अंश) |
चुरो | राजस्थान | 47.5 |
अकोला | महाराष्ट्र | 47.4 |
नागपुर | महाराष्ट्र | 47 |
गंगानगर | राजस्थान | 46.9 |
बिकानेर | राजस्थान | 46.8 |
चंद्रपुर | महाराष्ट्र | 46.8 |
बांदा | उत्तर प्रदेश | 46.6 |
खजुराओ | मध्य प्रदेश | 46.6 |
कोटा | राजस्थान | 46.5 |
अदिलाबाद | तेंलगणा | 46.3 |
दरम्यान, मागील सलग तीन दिवसांपासून नागपूर मध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. पुढील काही दिवसात सुद्धा परिस्थिती समान राहण्याचे अंदाज आहेत. अशावेळी नागरिकांनी सर्वतोपरी खबरदारी बाळगावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे .महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यात सुद्धा तापमान वाढत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाचे आगमन होऊ शकते.