Maharashtra Weather Report: राज्यात थंडीचा जोर वाढणार, पुढील 24 तासांत पावसाची शक्यता

13 डिसेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी उत्तर भारतात सतत दाखल होत असलेल्या पश्चिम मान्सूनमुळे पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे

Image For Representations (Photo Credits - PTI)

राज्यातील हवामानात (Weather Forecast) सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. डिसेंबर (December) महिना संपायला आला तरी, दरवर्षीप्रमाणे थंडी (Winter) पडलेली नाही. याउलट काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता (Rain Prediction) हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात गारठा वाढणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 13 डिसेंबरपर्यंत राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  (हेही वाचा - Michaung Cyclone: मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा)

उत्तरेत पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाल्याने थंडीचा जोर वाढत आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसाचीही शक्यता आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. राज्यात उत्तरेकडील वाऱ्यांमुळे पारा घसरेल आणि काही ठिकाणी थंडी वाढू शकते. येत्या 5 ते 6 दिवसांत मुंबई, पुण्यासह राज्यातील कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.

सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडी, काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात पावसाचा अंदाज आहे. याशिवाय विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

7 Bangladeshi Arrested: मुंबईतील आरसीएफ पोलिसांनी चेंबूरमधील माहुल गावातून बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या 7 बांग्लादेशी नागरिकांना केली अटक

Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वादात, राहुल गांधी यांचे गंभीर आरोप; ECI, देवेंद्र फडणवीस यांची तत्काळ प्रतिक्रिया

SL vs AUS 2nd Test 2025 Day 2 Live Scorecard: दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमावून जोडल्या 85 धावा, श्रीलंकेचा पहिला डाव 257 धावांवर आटोपला, पाहा सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड

SL vs AUS, 2nd Test Match 2025 Day 1 Stumps Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकाने 9 विकेट गमावून केल्या 229 धावा, दिनेश चांदीमल आणि कुसल मेंडिस यांनी झळकावले अर्धशतके; येथे पाहा स्कोरकार्ड

Share Now