Maharashtra Weather Forecast: उद्यापासून पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता- IMD
त्यामुळे उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबर पासून राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातून मान्सून (Monsoon) पूर्णपणे परतला असला तरी आता पुन्हा एकदा पावसासाठी (Rain) पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबर पासून राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर पासून पुढील 4 दिवस पावसाची शक्यता असून दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा प्रभाव असेल, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
दक्षिण-पूर्ण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं असून ते पुढील 2-3 दिवसांत पश्चिम दिशेने पुढे सरकणार आहे. परिणामी राज्यात पाऊस कोसळणार आहे. सोमवार, 1 नोव्हेंबर रोजी सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मंगळवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update: 1-2 नोव्हेंबरला राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता)
K S Hosalikar Tweet:
बुधवारी पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातार, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर गुरुवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे.
दरम्यान, 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आहे.