Maharashtra Weather Update: उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात गारठा कायम

आज देखील राज्यात तापमानातील घसरणीत चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Image For Representations (Photo Credits - PTI)

राज्यात सध्या सर्वत्र सध्या पारा हा घसरला (Cold Wave In Maharashtra) असून सकाळच्या वेळी थंडीचा परिणाम हा जास्त जाणवत आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी (Cold Wave) आणि धुके असं सर्वत्र वातावरण आहे. उत्तर भारतातील (North India) थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातही जाणवत आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील उंच भागात पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बहुतांश भागात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार (IMD), जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा ते बिहारपर्यंत पुढील तीन दिवस काही ठिकाणी हलके धुके आणि इतर ठिकाणी दाट धुके राहील.  (हेही वाचा - Weather Update: महाराष्ट्रात गारठा, दिल्ली धुक्यात गुडूप; 6 राज्यांमध्ये दोन दिवसांसाठी थंडीसाठी 'रेड अलर्ट')

राज्यातील अनेक भागात तापमानातील गारवा कायम आहे. आज देखील राज्यात तापमानातील घसरणीत चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  राज्यातील किमान तापमानाचा पारा 10 ते 21 अंशांच्या दरम्यान आहे. आज देखील हवामानात गारवा राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान मुंबईत देखील पारा हा घसरला असल्याने मुंबईकर सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे. मुंबईत सध्या किमान तापमानाचा पारा हा 20 अंशाच्या खाली असून कमाल तापमान ही 30 अंशाच्या खाली आहे.