Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर आणि धुळ्यात पावसाचा यलो अलर्ट

तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य भारतात पाऊस आहे.

Rain (PC - Twitter/ ANI)

महाराष्ट्रातही पावसाचा जोर (Maharashtra Heavy Rain) कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर आणि धुळे येथे मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातही अनेक राज्यांना पावसाचा इशारा हा देण्यात आला आहे. हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये आज म्हणजेच शनिवारी पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी, हवामान खात्याने दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. (हेही वाचा - Ganeshotsav ST Buses: एसटी महामंडळ गणेशोत्सवासाठी सोडणार अतिरिक्त बसेस)

बंगालचा उपसागर आहे. तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य भारतात पाऊस आहे. मध्य प्रदेशातील विविध भागात पावसासाठी हवामान विभागाने रेड, यलो आणि ऑरेंज असे तीन प्रकारचे अलर्ट जारी केले आहेत. छिंदवाडा, निवारी, रायसेन आणि नर्मदापुरममध्ये आज पावसाचा रेड अलर्ट आहे.इंदूरमध्ये पावसामुळे आज सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रातील पालघर आणि धुळे परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे खरिप हंगामातील पीकांना पाणी मिळू शकते त्यामुळे शेतकरी आणखी पावसाची आशा ही करत आहे.