Maharashtra Weather Forecast: थंडीच्या दिवसात पावसाला लहर,पालघर, नाशिक, धुळे नंदुरबारला ऑरेंज अ‌ॅलर्ट; मुंबईसह अनेक ठिकाणी हलक्या सरी

ऑक्टोबर महिन्यात दिवाळी संपली की थंडी हळूहळू स्थिरावू लागते. अनेकांना या थंडीचे मोठे कौतुक. पण थंडीचा आनंद घेणाऱ्यांच्या आनंदात पावसाने पाणी फिरवले आहे. होय, थंडीचा महिना म्हटल्या जाणाऱ्या ऐन डिसेंबरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

डिसेंबर महिना हा खरेतर हिवाळ्याचा महिना. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी संपली की थंडी हळूहळू स्थिरावू लागते. अनेकांना या थंडीचे मोठे कौतुक. पण थंडीचा आनंद घेणाऱ्यांच्या आनंदात पावसाने पाणी फिरवले आहे. होय, थंडीचा महिना म्हटल्या जाणाऱ्या ऐन डिसेंबरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात पुढील काही दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Light Rain) पडेल, वातावरण ढगाळ राहील असा अंदाज (Maharashtra Weather Forecast) हवामान विभागाने वर्तवला आहे. निसर्गाचे होणारे हे बदल आकलनापलीकडचे असल्याचे सामान्य नागरिक सांगतात. पाठिमागील दशकभरातील पावसाची नोंद पाहता नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत 30.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.या आधी नोव्हेंबर 2019 मध्येही दमदार पावसाची नोंद झाली आहे. 2019 मध्ये मध्ये 109.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. इतर वर्षांमध्ये नोव्हेंबरमध्ये पावसाची नोंद 5 मिमीपेक्षा कमी झाली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संभाव्य पावसाची शक्यता विचारात घेऊन हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काहींना यलो अलर्ट जारी केला आहे.

ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे

पालघर

नाशिक

धुळे

नंदुरबार

यलो अ‌लर्ट असलेले जिल्हे

मुंबई

ठाणे

दरम्यान, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर येत्या 3 डिसेंबरपर्यंत मुंबईमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, धूळे, नंदुरबार, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.