Maharashtra Weather Forecast: पुढील 2-3 दिवसात मुंबई, ठाणे, कोकणात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस - IMD

दरम्यान पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. परतीच्या मार्गावर निघालेला मान्सून हळूहळू कमी होत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे.

Rain | mage Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Maharashtra Weather Forecast: पुढील 2-3 दिवसात मुंबई, (Mumbai) ठाणे, (Thane) कोकणात (Kokan) हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. परतीच्या मार्गावर निघालेला मान्सून हळूहळू कमी होत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे.

सोमवारी सकाळी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे कोकणातील भातपीकाचे मोठे नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्रातदेखील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. (हेही वाचा - Pune-Lonavala Local Train: 12 ऑक्टोबरपासून सुरु होणार पुणे-लोणावळा लोकल ट्रेन; फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच मिळणार प्रवेश)

याशिवाय पुढील दोन ते तीन दिवसात पूर्व विदर्भात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच आज भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व नागपूर जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी मराठवाड्यातील परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, येत्या 9 ऑक्टोबरच्या दरम्यान बंगाल उपसागराच्या परिसरात आणि उत्तर अंदमान परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. 3 ऑक्टोबरपासून राजस्थानचा बहुतांशी भाग, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागात पावसाची उघडीप झाली आहे. याशिवाय वाऱ्यांची दिशा, हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे.