Maharashtra Weather Forecast: विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात पुढील 3-4 तास वीजेच्या कडकडाटासह पाऊस, गारपीट होण्याची शक्यता: IMD

महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या नजीक असलेल्या उत्तर विदर्भ आणि मराठवाडा भागामध्ये आज (17 फेब्रुवारी) येत्या 3-4 तासांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Cloudy Weather | Representational Image (Photo Credits: Pixabay)

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या नजीक असलेल्या उत्तर विदर्भ आणि मराठवाडा भागामध्ये आज (17 फेब्रुवारी) येत्या 3-4 तासांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळेस वीजांचा कडकडाटासह पाऊस बरसू शकतो असं सांगण्यात आले आहे. यापूर्वीच IMD कडून या भागामध्ये गारपीट (Hailstorm)होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आणि सामान्य नागरिकांनी शेताच्या कामाची आणि एकूणच बाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा जरा अंदाज घेऊनच बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आले आहे.

IMD मुंबई चे KS Hosalikar यांनी ट्वीट करत महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज असल्याचं म्हटलं आहे. त्याला अनुकूल ढगांची स्थिती देखील असल्याचं म्हणत नवे सॅटेलाईट फोटोज शेअर केले आहेत. Maharashtra Weather Forecast: विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 16-18 फेब्रुवारी दरम्यान वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता.

दरम्यान मुंबई मध्ये त्याचा फारसा प्रभाव आढळत नाही. परंतू यापूर्वीच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हे पावसाळी हवामान 18 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरळीत होण्यास सुरूवात होईल. सध्या अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा अवकाळी पाऊस आला आहे.