Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट; जून 17 पर्यंतचा हवामान अंदाज

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी 13 ते 17 जून 2025 या कालावधीत मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यांचा इशारा दिला आहे. जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घ्या.

Monsoon Rain | (Photo credit: archived, edited, representative image)

2025: भारतीय हवामान विभागाने 13 जून 2025 रोजी जाहीर केलेल्या हवामान (Maharashtra Weather Forecast 2025) बुलेटिननुसार, महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, यामुळे जनतेला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. आयएमडीने जारी केलाले हवामान अंदाज 13 ते 17 जून या पाच दिवसांसाठी असेल. ज्यामध्ये मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळे (Thunderstorm Warning), ढगातून जमिनीवर वीज पडणे आणि विविध प्रदेशांमध्ये ताशी 40-60 किमी/वेगाने वारे वाहू लागेल, असा अंदाज वर्तवला आहे.

मुसळधार पावसाची शक्यता असलेले जिल्हे

कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हे जिल्हे वादळी वाऱ्यांसह 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावाखाली असतील. मुंबई व ठाणे शहरांसह पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड मध्ये 14 जूनला मुसळधार पावसाचा अंदाज; पहा उद्याचा हवामान अंदाज)

प्रत्येक दिवसानुसार हवामानाचा अंदाज

पाऊस आणि हवामानाचे संभाव्य परिणाम

  • विजांच्या कडकडाटामुळे घराबाहेर राहणाऱ्यांना धोका.
  • वादळी वाऱ्यांमुळे झाडे आणि विजेच्या तारांचे नुकसान होण्याची शक्यता.
  • कोकणातील आणि घाटमाथ्यांतील जिल्ह्यांमध्ये दरड कोसळण्याचा धोका.
  • शेतपिकांचे नुकसान आणि शेतीसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता.

आयएमडीकडून सोशल मीडियावर माहिती

नागरिकांसाठी खबरदारीचे उपाय

  • विजांच्या कडकडाटाच्या वेळी उंच झाडाखाली थांबू नका.
  • पाणी साठलेली ठिकाणे आणि उघड्यावर काम करण्याचे टाळा.
  • घरातील विजेची उपकरणे अनप्लग करा आणि जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवा.
  • शेतकऱ्यांनी तातडीने परिपक्व पीके काढून सुरक्षित स्थळी साठवावीत. पाण्याचा निचरा होईल असे उपाय करावेत.

दरम्यान, महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर राहणार असून, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी दक्षता घ्यावी. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असून, पुढील काही दिवस घराबाहेर जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज पाहणे गरजेचे ठरेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement