Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 20 जानेवारीपासून पुन्हा येणार थंडीची लाट, नाशिकचा पारा 12 अंशाच्या खाली जाण्याची शक्यता- IMD
तर किमान तापमानात घट होऊन मुंबईतील कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Forecast Update: अनेक देशात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना देखील काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरत चालला आहे. दरम्यान ही परिस्थिती अशीच कायम राहून येत्या 20 जानेवारी राज्यात पुन्हा एकदा थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. त्यानुसार येत्या 20 जानेवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कोकणात थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
तसेच के एस होसाळीकर यांनी दिलेल्या ट्विटनुसार येत्या 22,23 जानेवारीला पुणे, नाशिकचा पारा हा 12 अंशाच्या खाली जाण्याची शक्यता वर्तविली आहे. तर किमान तापमानात घट होऊन मुंबईतील कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.हेदेखील वाचा- Winter Health Tips: हिवाळ्यात आजरांपासून दूर राहण्यासाठी करा 'या' औषधी वनस्पतींचा वापर
राज्यातील आजचे (16 जानेवारी) तापमान (अंश सेल्सीयसमध्ये)
मुंबई- 16.6
परभणी - 17.0
जालना- 19.0
नांदेड- 17.4
पुणे- 16.0
नागपूर- 12.6
गडचिरोली-13.2
चंद्रपूर-13.6
तसेच येत्या 22 जानेवारीनंतर मुंबईतील तापमान 16 अंश सेल्सियसच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे. अशा कडाक्याची थंडीत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि स्वत:चे थंडीत होणा-या आजारांपासून रक्षण करावे असे आवाहन हवामान विभागाकडून केले जात आहे.
राज्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय बदल पाहायला मिळाले. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी हवामान ढगाळ राहिले. त्यामुळे म्हणावे तितक्या प्रमाणात राज्यात थंडी जाणवली नाही. परंतू, राज्यातील ढगाळ वातावरण जसजसे कमी होऊ लागले तसतसे थंडीचे प्रामा वाढू लागले.