Maharashtra Weather Forecast For Tomorrow: काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या महाराष्ट्रातील उद्याचे हवामान
उद्याचे हवामान पाहता भारतीय हवामान विभाग (IMD) ने तीव्र तापमान आणि तीव्र आर्द्रतेचा इशारा दिला आहे, ज्यामुळे मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये संध्याकाळी तुरळक हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वाढते.
Maharashtra Weather Forecast For Tomorrow: महाराष्ट्रामधील मान्सूनच्या (Maharashtra Monsoon) आगमनाच्या तारखेची बातमी जरी दिलासादायक असली तरी, राज्यात काही ठिकाणी गुरुवारपासून उष्णतेच्या लाटेसह उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागणार आहे. राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे आणि शुक्रवार, 24 मे पर्यंत काही ठिकाणी हा पॅटर्न कायम राहण्याची किंवा आणखी तीव्र होण्याची अपेक्षा आहे. उद्याचे हवामान पाहता, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वादळी वारे, विजांचा कडकडाट तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून जसजसा जवळ येत आहे, तसतसे महाराष्ट्रातील दुर्गम भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वाऱ्यासह गडगडाटी वादळाची शक्यता आहे.
उद्यासाठी भारतीय हवामान विभाग (IMD) ने तीव्र तापमान आणि तीव्र आर्द्रतेचा इशारा दिला आहे, ज्यामुळे मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये संध्याकाळी तुरळक हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वाढते. याशिवाय, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात शनिवारपर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे.
जाणून घ्या राज्यातील उद्याचे हवामान-
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये उद्याचे हवामान कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता आहे.
अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपुर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी मुंबईमध्ये संध्याकाळी अंशतः ढगाळ आकाश राहील, यासह ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसभरात संपूर्ण शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 22 मे रोजी वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हे कमी दाबाचे क्षेत्र 24 मे पर्यंत तीव्र होण्याची अपेक्षा आहे. मोसमी मोसमी वाऱ्यांच्या प्रवेशासाठी या घडामोडी अनुकूल आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास, मान्सूनचे वारे केरळमध्ये वेळेआधीच प्रवेश करू शकतात, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे, ज्यामुळे मान्सूनचा हंगाम लवकर सुरू होईल.