Maharashtra Weather Forecast For Today: महाराष्ट्रामध्ये आज हवामान अंदाज काय? घ्या जाणून
21-24 सप्टेंबर दरम्यान पालघर, ठाणे, रायगड मध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.
यंदा दमदार पावसानंतर आता त्याचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पण या परतीच्या प्रवासापूर्वी राज्यात तो बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान आयएमडी(IMD) च्या अंदाजानुसार, आज (21 सप्टेंबर) दिवशी कोकण, गोवा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर पुढील 2-3 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा हवामान अंदाज (Maharashtra Weather Forecast) आज वर्तवण्यात आला आहे.
तर पुणे, नंदूरबार, नाशिक मध्येही विजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह वादळी वार्याचा पाऊस बरसू शकतो. असा अंदाज आहे. येत्या चार महिन्यामध्ये चार दिवस मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो. यावेळी वार्याचा वेग 30-40 किमी प्रतितास आहे. यावेळी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुण्यामध्ये आज आकाश अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. संध्याकाळपर्यंत हलक्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. तर उद्यापासून 3 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून संध्याकाळी पाऊस बरसू शकतो.