महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता; लवकरच होणार अधिकृत घोषणा

आदित्य वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Aaditya Thackeray (Photo Credits: PTI)

Maharashtra Vidhan Sabha Elections 2019:  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2019 साठी शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपा पक्षामध्ये युती आणि जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुखांनी 14 उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत. त्यानंतर आता शिवसेना पक्षाकडून युवासेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) देखील यंदा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. आदित्य वरळी विधानसभा मतदारसंघातून (Worli Assembly Seat) निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना - भाजप युतीची घोषणा होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्याकडून विजय शिवतरे सह 14 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप

आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास ते ठाकरे घराण्यातून निवडणूक लढणारे पहिले ठाकरे ठरणार आहेत. महाराष्ट्र संयुक्त चळवळीपासून ठाकरे कुटुंबाभोवती राजकारण फिरत आहे. प्रबोधनकार ठाकरे, बाळ ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला असला तरीही निवडणूक लढवली नव्हती. मात्र आता पायंडा आदित्य ठाकरे मोडण्याची शक्यता आहे.

ANI Tweet 

काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांनी जन आशिर्वाद यात्रा करून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनीदेखील आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढावी यासाठी इच्छा बोलून दाखवली होती.

महाराष्ट्रामध्ये येत्या 21 ऑक्टोबरला 288 विधानसभाजागांसाठी  मतदान आहे. तर 24 ऑक्टोबर दिवशी निवडणूकीचे लागणार आहेत. सध्या अस्तित्त्वात असलेल्या निवडणूकीचा कार्यकाल 9 ओभेंबर 2019 दिवशी संपणार आहे.