Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाला सुधारित मशाल निवडणूक चिन्ह

निवडणूकीमध्ये ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून मशाल मध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे.

Shiv Sena Logo | X

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आता अगदी महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. या निवडणूकीमध्ये ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून मशाल मध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. पूर्वी दिले गेलेलं चिन्हं हे आईस्क्रिमच्या कोन सारखं दिसत होतं. त्यामुळे आता त्याच्या डिझाईन मध्ये थोडा बदल करत सुधारित मशाल चिन्हं जारी करण्यात आलं आहे.

शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात पडलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मशाल हे पक्ष चिन्ह देण्यात आलं. आता ठाकरे गटाकडून दिलेल्या माहितीनुसार, पक्षचिन्हामध्ये बदल झालेला नाही पण त्याचं डिझाईन केवळ सुधारण्यात आलं आहे.

धनुष्यबाण हा शिवसेनेचे चिन्ह होतं. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी 1985  साली ‘ज्वलंत मशाल’ चिन्ह वापरून निवडणूक जिंकली होती.

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. 23 नोव्हेंबरला त्याचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान यासाठी 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान महाविकास आघाडी मधून शिवसेना उद्धव ठाकरे लढणार आहेत. मविआ चं जागावाटप आता अंतिम टप्प्यामध्ये आलं असून येत्या काही दिवसात ते जाहीर होणार आहे.