महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मतदान कसं कराल? पहा आमदार निवडीच्या मतदानाच्या वेळेस EVM मध्ये मत बंद झाल्यानंतर VVPAT वर कसं तपासाल
288 आमदार निवडीसाठी महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Maharashtra Assembly Elections 2019 Date and Voting Time: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Elections) च्या माध्यमातून यंदा 21 ऑक्टोबर दिवशी राज्यातील नागरिक मतदान (Voting) करणार आहेत. या मतदानानंतर राज्यातील विधानसभेवर (Vidhan Sabha) कुणाची सत्ता स्थापन होणार? याचा उलगडा होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री (CM) आणि 288 आमदार निवडीसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मग विधानसभा निवडणूक 2019 साठी मतदान करताना मतदार म्हणून मत कसं कराल हे तुम्हांला ठाऊक आहे का? यंदा विधानसभा निवडणूक मतदान देखील ईव्हीएम (EVM) मतदान यंत्रावर होणार आहे. तसेच व्हीव्हीपॅट यंत्रावर (VVPAT) तुम्ही दिलेल्या उमेदवारालाच मिळाले आहे का? हे तपासून पाहण्याची सोय निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आली आहे. इथे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चा सारे अपडेट्स.
मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदारयादीमध्ये असणं आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडून मतदारसंघामध्ये मतदान केंद्राची उभारणी केली जाते त्यामुळे तुमचे नाव ज्या मतदार केंद्रामध्ये आहे ते पाहून मतदानाचा हक्क बजावू शकता. Maharashtra Assembly Elections 2019: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल, जाणून घ्या सोप्प्या स्टेप्स.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी मतदान कसं कराल?
- 18 वर्षावरील सज्ञान नागरिक त्याच्या ओळखपत्रासोबत मतदान करू शकतो.
- मतदान करण्याची अनुमती केवळ ज्याचं नाव अधिकृत मतदान यादीमध्ये आहे त्यांनाच मिळू शकतो.
- मतदार यादीमध्ये नाव पाहिल्यानंतर तुमचं ओळखपत्र पाहिलं जाईल. तुम्हांला निवडणूक आयोगाच्या रजिस्टरवर स्वाक्षरी / अंगठा द्यावा लागतो.त्यानंतर तुमच्या बोटावर शाई लावली जाईल. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मतदान दिवशी Photo voter slips नव्हे तर PAN Card, Aadhaar Card सह ही '11' ओळखापत्र ग्राह्य ठरणार!
- पुढे ईव्हीएम मशीनवर तुम्हांला ज्यांना मतदान करायचं आहे त्याच्या नाव आणि चिन्हासमोरील बटण दाबून मत रजिस्टर करता येऊ शकतं.
- तुम्ही ज्याला मतदान केलं आहे त्याच्यासमोर लाल रंगाचा बटण काही काळ ऑन दिसेल.
- यंदा ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीनदेखील असतील. त्यामध्ये तुम्ही दिलेले मत योग्य उमेदवाराला किंवा नोटाला दिले आहे की नाही याची तुम्हांला माहिती स्क्रीनवर आणि एका स्लिपच्या माध्यमातून मिळेल. ही स्लीप तुमच्या हातामध्ये मिळणार नाही.
महाराष्ट्र विधानसभा मतदानाची तारीख आणि वेळ
तारीख - 21 ऑक्टोबर
वेळ - सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत
2014 च्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा,शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर कौल दिला आहे. राज्यात 4739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याने त्यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)