महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: आदित्य ठाकरे 'करोडपती'; 11 कोटी 38 लाखांच्या संपत्तीमध्ये BMW कार, सोनं ते शेत जमिनीचा समावेश
आदित्य ठाकरे यांच्याकडे 11 कोटी 38 लाख रूपयांची संपत्ती आहे.
Maharashtra Assembly Elections 2019: शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज (3 ऑक्टोबर) वरळी विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. लोअर परेल ते वरळीपर्यंत आज शिवसैनिकांनी शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरेला पाठिंबा दाखवला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या संपत्ती जाहीर केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे 11 कोटी 38 लाख रूपयांची संपत्ती आहे. आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, मनसेकडून विरोधात उमेदवार नाही, उद्धव ठाकरे यांनी दिली बोलकी प्रतिक्रिया.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, आज वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरताना जाहीर केलेल्या संपत्तीनुसार त्यांच्या नावावर बॅंकेमध्ये 10 कोटी 36 लाख रूपये आहेत. तर 64 लाख 65 हजार रूपयांचे दागिने, 20 लाख 39 हजारचे बॉन्ड्स आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्जात जाहीर केलेल्या मालमत्तेनुसार राणेंकडे 11 कोटी 38 लाख रूपयांची ठेव आहे. Maharashtra Assembly Elections 2019: भाजप पक्षातील सर्वात श्रीमंत उमेदवार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे 441 करोडची संपत्ती.
आदित्य ठाकरे ट्वीट
आदित्य ठाकरेंच्या रूपाने ठाकरे घरातील पहिली व्यक्ती यंदा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. यावेळेस मी इथल्या शिवसैनिकांना, जनतेला त्याचप्रमाणे कट्टर शिवसैनिक सुनील शिंदे यांना धन्यवाद देतो. इथल्या जनतेने आणि तमाम शिवसैनिकांनी आदित्यचा आनंदाने स्वीकार केला त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत." अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. अद्याप मनसे किंवा राष्ट्रवादी पक्षाने आदित्य विरोधात उमेदवार जाहीर केलेला नाही. महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबरला मतदान आहे. तर 24 ऑक्टोबर मतमोजणी पार पडणार आहे.