Maharashtra Unlock: महाराष्ट्र अनलॉक! राज्य सरकारकडून आदेश मध्यरात्री जारी, टप्प्यांमध्ये हटणार लॉकडाऊन
त्यामुळे सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. असे असले तरी अद्यापही लसीकरण मोहिमेला म्हणावा तसा वेग आला नाही. त्यामुळे धोका अद्यापही कायम आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊन हटणार की कायम राहणार. महाराष्ट्र अनलॉक झाला किंवा नाही. निर्बंध आहेत किंवा नाहीत. कोणकोणत्या गोष्टींवर निर्बंध कायम असतील? यांसारख्या असंख्य प्रश्नांवरुन निर्माण झालेला संभ्रम महाराष्ट्र सरकारने अखेर दूर केला आहे. लॉकडाऊन महाराष्ट्र अनलॉक करण्याबाबत राज्य सरकारने 4 जूनच्या मध्यरात्री आदेश जारी केले. या आदेशानुसार येत्या 7 जून (सोमवार) पासून महाराष्ट्र 5 टप्प्यांमध्ये अनलॉक (Maharashtra Unlock) करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये असलेली सक्रीय रुग्णसंख्या, उपलब्ध आणि कार्यरत असलेले ऑक्सिजन बेड यांवरुन हे पाच ठप्पे निश्चित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र अनलॉकचे 5 टप्पे आणि इतर बाबी घ्या जाणून.
महाराष्ट्र अनलॉक पाच टप्पे
- पहिला टप्पा- कोरोना रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड 25% कमी असावेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट 5% असावा.
- दुसरा टप्पा- जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट 5% किंवा त्याहून कमी असावा. ऑक्सिजन बेड्स 25 ते 40% इतक्या प्रमाणात व्यापलेले असावेत.
- तिसरा टप्पा: जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10% आहे आणि कोरोना रुग्णांनी व्यापलेल्या ऑक्सिजन बेडसंख्या 40% टक्क्यांपेक्षा कमी आहे
- चौथा टप्पा: जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20% असावा. कोरोना रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड 60% टक्क्यांपेक्षा अधिक असलेले जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात.
- पाचवा टप्पा: जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट 20%. कोरोना रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड 75 % टक्क्यांपेक्षा अधिक असलेले जिल्हे.
महाराष्ट्रात पहिल्या पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे, दुसर्या टप्प्यात 6 जिल्हे, तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्हे, चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यात अनलॉक होणार आहे. दिलासादायक म्हणजे पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. (हेही वाचा, चंद्रपूर जिल्ह्यातील निर्बंध सोमवारपासून शिथिल होणार, 'या' सेवांना मिळणार परवानगी)
पहिल्या टप्प्यात अनलॉक होणारे जिल्हे.
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, गोंदिया जळगाव, परभणी,ठाणे,वर्धा, वाशिम, यवतमाळ
दुसऱ्या टप्प्यात अनलॉक होणारे जिल्हे.
मुंबई, मुंबई उपनगर, अहमदनगर, अमरावती, हिंगोली, नंदुरबार
तिसऱ्या टप्प्यात अनलॉक होणारे जिल्हे.
अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
चौथ्या टप्प्यात अनलॉक होणारे जिल्हे.
पुणे, रायगड
पाचवा टप्पा
पाचव्या टप्यात एकाही जिल्ह्याचा समावेश नाही
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. असे असले तरी अद्यापही लसीकरण मोहिमेला म्हणावा तसा वेग आला नाही. त्यामुळे धोका अद्यापही कायम आहे.