पुणे: 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला तब्बल 16 तासांनंतर बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांना यश
पुण्यातील मंचर येथे 200 फुट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची तब्बल 16 तासांनंतर सुटका करण्यात आली आहे.
पुण्यातील मंचर येथे 200 फुट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची तब्बल 16 तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. रवी पंडित असे या मुलाचे नाव असून तो अवघ्या 6 वर्षांचा आहे. बुधवारी (20/2/2019) सायंकाळी 4:30-5 च्या दरम्यान रवी बोअरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफकडून सुरु असलेल्या मदत कार्यात रात्रीच्या अंधारामुळे अडचणी येत होत्या. अखेर 16 तासांनंतर रवीला सुखरुप बाहेर काढण्याचे एनडीआरएफच्या जवानांना यश आलं. (पुणे: 200 फूट खोल बोअरवेलमध्ये 10 फुटांवर अडकला 6 वर्षांचा मुलगा)
रवी खेळत असलेल्या परिसरात रस्त्यांच बांधकाम सुरु आहे. त्याचे आई-वडील बांधकाम मजूर असल्याने तो ही तिथेच खेळत होता. मात्र बोअरवेलला झाकण नसल्याने रवी बोअरवेलमध्ये पडला. त्यानंतर तातडीने पोलिस आणि एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. रवीचा कमरेचा भाग अडकला असल्याने त्याला बाहेर काढण्यात अडचण येत होती. मात्र अखेर त्याची सुटका झाली. या घटनेतील दोषींवर कायेदशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.