Maharashtra TET Exam 2021 Date: शिक्षक पात्रता परीक्षा पुन्हा लांबणीवर; 30 ऑक्टोबर ऐवजी 21नोव्हेंबरला
30 ऑक्टोबर दिवशी होणार्या परीक्षेसाठी 14 ऑक्टोबरला अॅडमीट कार्ड जारी करण्यात आले पण आता 21 नोव्हेंबर दिवशी परीक्षा होणार असल्याने त्याचं नवं अॅडमीट कार्ड पुन्हा नव्याने उमेदवारांना देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रामध्ये शिक्षकांसाठी होणार्या शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (Maharashtra TET Exam) यंदा पुन्हा एकदा लांबणीवर पदली आहे. महाराष्ट्र स्टेट काऊंसिल ऑफ एक्झामिनेशन कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर दिवशी होणारी ही परीक्षा 21 नोव्हेंबर दिवशी होणार आहे. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्यान MAHATET परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी देखील 10 ऑक्टोबरला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा युपीएससी परीक्षेसोबत क्लॅश होत असल्याने लांबणीवर टाकण्यात आली आहे.
30 ऑक्टोबर दिवशी होणार्या परीक्षेसाठी 14 ऑक्टोबरला अॅडमीट कार्ड जारी करण्यात आले पण आता 21 नोव्हेंबर दिवशी परीक्षा होणार असल्याने त्याचं नवं अॅडमीट कार्ड पुन्हा नव्याने उमेदवारांना देण्यात येणार आहे. CTET Online Application 2021 Date: सीबीएसई कडून CTET च्या रजिस्ट्रेशन साठी 25 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ.
2018-19 नंतर आता पहिल्यांदाच MAHATET परीक्षा होणार आहे. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देतात पण गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता शिक्षणविभागाकडून देण्यात आली आहे. मध्यंतरी कोविड संकटामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.
इयत्ता पहिली ते आठवी च्या मुलांना शिकवण्याकरिता शिक्षक भरतीसाठी टीईटी(TET)परीक्षा घेतली जात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांवर या परीक्षेच्या निकालानुसार नोकरभरती करण्यास मदत होणार आहे.