Maharashtra TET 2021: शालेय शिक्षक होण्यास उमेदवार 3 ऑगस्ट पासून mahatet.in वर करू शकतात अर्ज; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक

इच्छुक उमेदवार Teacher Eligibility Test साठी आपला अर्ज ऑनलाईन दाखल करू शकतात.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash.com)

महाराष्ट्र स्टेट काऊंसिल ऑफ एक्झामिनेशन (Maharashtra State Council of Examination) कडून Maharashtra TET 2021 साठी प्रवेश अर्ज घेण्यास सुरूवात झाली आहे. उद्या 3 ऑगस्ट पासून त्याला सुरूवात होणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट आहे. इच्छुक उमेदवार Teacher Eligibility Test साठी आपला अर्ज ऑनलाईन दाखल करू शकतात. त्यासाठी त्यांना MAHATET चे अधिकृत संकेतस्थळ mahatet.in वर भेट द्यावी लागणार आहे.

MAHATET 2021 यंदा 15 सप्टेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान होणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून राज्यात पहिली ते आठवी साठी शिक्षकांची नियुक्ती केली जाते. भावी शालेय शिक्षक निवडले जातात. 10 लाख पेक्षा अधिक उमेदवार यंदा टीईटी परीक्षेसाठी अर्ज भरू शकतील असा अंदाज आहे. शेवटची टीईटी परीक्षा राज्यात 2019 साली झाली होती. दरम्यान या परीक्षेबाबतची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हांला mahatet.in वर भेट द्यावी लागणार आहे.

MAHA TET 2021 साठी महत्त्वाच्या तारखा:

रजिस्ट्रेशन सुरू होणार - 3 ऑगस्ट

रजिस्ट्रेशन अंतिम तारीख - 25 ऑगस्ट

अ‍ॅडमिशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड साठी - 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर

परीक्षेची तारीख - 10 ऑक्टोबर

टीईटी परीक्षेसाठी दोन सत्रामध्ये परीक्षा होते. पहिला पेपर 10.30 ते 1 आणि दुसरा 2 ते 4.30 या वेळेत होणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने टीईटी क्लालिफिकेशन सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी जून 2021 मध्ये 7 वर्षांवरून आता लाईफटाइम पर्यंत वाढवली आहे. नव्या टीईटी प्रमाणपत्राची पुर्तता किंवा त्याच्या वैधतेच्या कालमर्यादेचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे. केंद्र सरकारच्याया निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये करियर करणार्‍या इच्छुक उमेदवारांच्या रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.