Maharashtra SSC July 2019 Supplementary Result: 10 वी फेरपरीक्षा निकाल mahresult.nic.in वर जाहीर; पुरवणी परीक्षेचा निकाल असा पहा ऑनलाईन

यंदा 17-30 जुलै दरम्यान पार पडलेल्या 10 वी पुरवणी परीक्षेला सुमारे 2 लाख 34 हजार 631 विद्यार्थी सामोरे गेले होते. त्यांचा निकाल आज शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आला आहे.

Results 2019 (Photo Credits: Facebook)

Maharashtra Board SSC 10th Supplementary Results 2019 Declared: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बोर्डाच्या पुरवणी परीक्षा 12 वीचा निकाल शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानंतर आता 10 वी च्या विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा 17-30 जुलै दरम्यान पार पडलेल्या 10 वी पुरवणी परीक्षेला सुमारे 2 लाख 34 हजार 631 विद्यार्थी सामोरे गेले होते. त्यांचा निकाल आज शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आला आहे. या अधिकृत वेबसाईट्स सोबतच  examresults.netindiaresults.com आणि results.gov.in  वर 10 वी च्या विद्यार्थ्यांना या वेबसाईट्सवरही निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी म्हणून पुरवणी परीक्षा घेतली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे एका शैक्षणिक वर्षाचे नुकसान टाळता येऊ शकते. Open SSC Exam : दिव्यांग, कलाकार आणि खेळाडू विद्यार्थी शाळेशिवाय देऊ शकणार दहावीची परीक्षा

कसा पहाल तुमचा 10 वी पुरवणी परीक्षा निकाल 2019?

- महाराष्ट्र शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in  वर क्लिक करा.

- Maharashtra SSC Supplementary Result 2019 या लिंकवर जाऊन क्लिक करा.

- निकालाचे लॉग इन पेज ओपन होईल.

- यामध्ये हॉल तिकीट नंबर, जन्मतारीख, आईचे नाव आणि इतर महत्त्वाची माहिती भरुन सबमिट बटणावर क्लिक करा.

- तुमचा Maharashtra SSC Supplementary Result 2019 निकाल पुढील पेजवर दिसेल.

- या निकालाची प्रिंट काढू शकता किंवा ऑनलाईन प्रत सेव्ह करु शकता.

यंदा 2018- 19 या शैक्षणिक वर्षामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मागील 12 वर्षांमधील निच्चांकी लागला होता. महाराष्ट्र राज्याचा फेब्रुवारी - मार्च महिन्यात लागलेला निकाल हा 77.10% इतका होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement