Mumbai Fraud Case: केवळ 13,000 रुपये पगारावर, गर्लफ्रेंडला आलीशान कार आणि फ्लॅट गिफ्ट; क्रीडा संकुलास 21 कोटी रुपयांचा गंडा
दोन साथीदारांना अटक, मुख्य आरोपी फरार.
Sports Complex Financial Scam: सरकारी क्रीडा संकुलातील संगणक ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या हर्षल कुमार क्षीरसागर नावाच्या कर्मचाऱ्याने केलेला कारनामा पाहून प्रशासनच काय पोलिसही चकित झाले आहेत. त्याने चक्क 21 कोटी रुपयांची हेराफेरी (Maharashtra Fraud News) केलाचा आरोप आहे. ज्यामधून मिळालेल्या पैशांतून त्याने गर्लफ्रेंडला 1.2 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कार, 1.3 कोटी रुपयांची एसयूव्ही आणि 32 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू बाईक यासह लक्झरी भेट दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर 4 खोल्यांचा आलिशान फ्लॅटही त्याने तिला दिल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक म्हणजे या पठ्ठ्याला केवळ 13,000/- रुपये इतका पगार आहे. असे असताना त्याचे हे नखरे पाहून अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र, आता हळूहळू त्याच्या श्रीमंतीचे रहस्य उलघडू लागले आहे.
आरोपी कंत्राटी कर्मचारी
हर्षल कुमार क्षीरसागर हा सरकारी क्रीडा संकुलातील संगणक ऑपरेटर आहे. केवळ 13, 000 रुपये मासिक पगारासह कंत्राटी आधारावर कार्यरत असलेल्या 23 वर्षीय तरुणाने 1.2 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कार, 1.3 कोटी रुपयांची एसयूव्ही आणि 32 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू बाईक यासह लक्झरी वाहने खरेदी करण्यासाठी अपहार केलेल्या निधीचा वापर केला. याव्यतिरिक्त, हर्षलने त्याच्या प्रेयसीला छत्रपती संभाजीनगर विमानतळाजवळील 4 बीएचकेचा आलिशान फ्लॅट भेट दिल्याचे आणि तिच्यासाठी हिऱ्यांचा चष्मा मागविल्याचे सांगितले जाते. (हेही वाचा, Navi Mumbai: नवी मुंबईत जमीन खरेदीदारांची २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल)
- बनावटगिरीः त्याने क्रीडा संकुलाच्या जुन्या लेटरहेडचा वापर करून बँकेला त्याच्या खात्याशी जोडलेला ईमेल पत्ता बदलण्याची विनंती केली.
- फसवणूकः हर्षलने अधिकृत ईमेलसारखे दिसण्यासाठी किरकोळ बदलासह एक नवीन ईमेल आयडी तयार केला आणि तो बँक खात्याशी जोडला.
- इंटरनेट बँकिंग प्रवेशः एकदा ईमेल लिंक झाल्यानंतर त्याने खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सक्रिय केले.
- 1 जुलै ते 7 डिसेंबर 2024 दरम्यान हर्षलने 13 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 21.6 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे.
पोलिस कारवाई आणि अटक
- क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्याने आर्थिक अनियमितता ओळखून तक्रार दाखल केली तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली.
- अटकः हर्षलला मदत केल्याबद्दल यशोदा शेट्टी आणि तिचा पती बी. के. जीवन या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
- जप्तीः पोलिसांनी लक्झरी वाहने जप्त केली आहेत आणि त्यात सामील असलेल्या बँक खात्यांची तपासणी करत आहेत.
- फरार आरोपीः हर्षल अद्याप फरार आहे आणि अधिकाऱ्यांनी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.
वरिष्ठ अधिकारी प्रशांत कदम म्हणाले, "एफआयआरमध्ये तीन लोकांची नावे आहेत. दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे. तपासात असे दिसून आले आहे की, त्याने लक्झरी वाहने, एक महागडे घर आणि सोन्याचे दागिने खरेदी केले. आम्ही आणखी पुरावे गोळा करत आहोत आणि त्याला पकडण्यासाठी काम करत आहोत ". या मोठ्या फसवणुकीत आणखी व्यक्तींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. इतर संभाव्य साथीदारांना ओळखण्यासाठी वापरलेल्या बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.