अहमदनर येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार जणांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर (Ahmednagar) येथे पोलिसांनी हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Sex Racket Busted. (Photo Credit: PTI)

अहमदनगर (Ahmednagar) येथे पोलिसांनी हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेवडी येथील एका बंगल्यामध्ये हे सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या बंगल्यावर धाड टाकत आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार महिला आणि एका व्यक्तीला अटक केली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना शेवडी येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकट एका बंगल्यात सुरु असल्याची माहिती मिळाली होती. तर बंगल्याची पुढील बाजू ही मांस विक्रीसाठी देण्यात आली होती. तर बंगल्याच्या पाठील बाजूस हे सेक्स रॅकेट सुरु होते. तसेच हा बंगला एका उच्चभ्रु कॉलीनीत असून तेथे डॉक्टरांपासून ते व्यावसायिकांची घरे आहेत. हे सेक्स रॅकेट रत्नप्रभा नावाच्या बंगल्यामध्ये सुरु होते. गुरुवारी रात्री पोलिसांनी या बंगल्यावर धाड टाकत चार महिलाआणि एका व्यक्तिला अटक केली आहे. परंतु अटक करण्यात आलेल्या महिला या भारतीय नसून आरोपी व्यक्ती येथील नजीकच्या कॉलनीमध्ये राहतो.

या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वीही पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळींना अटक केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement