Maharashtra: राज्यात लॉकडाउनच्या काळात बुडून मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 13 टक्क्यांनी वाढ

त्यात नागरिकांना समुद्रावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु तरीही महाराष्ट्रात 2019 या वर्षाच्या तुलनेत 2020 मध्ये बुडून मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI))

Maharashtra: कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 2020 च्या वर्षात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. तसेच लॉकडाउनसाठी काही निर्बंध ही लागू केले होते. त्यात नागरिकांना समुद्रावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु तरीही महाराष्ट्रात 2019 या वर्षाच्या तुलनेत 2020 मध्ये बुडून मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.(Mumbai: पार्क, गार्डन सुरु किंवा बंद ठेवण्यासंदर्भात गोंधळाची स्थिती; विरोधकांकडून महापालिकेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह)

मध्य प्रदेशानंतर (5779) महाराष्ट्रात (5136) बुडून मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याबद्दलची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) यांनी दिली आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 88 टक्के लोक ही पाण्यात बुडून मृत पावली आहेत.

मुंबई अग्निशमन दलाचे चीफ फायर ऑफिसर हेमंत परब यांनी असे म्हटले की, आम्ही मुंबईतील सहा बीचवर लाइफगार्ड तैनात केले आहेत. जेणेकरुन त्या ठिकाणी पाण्यात बुडून मरणाऱ्यांचा आकडा कमी होईल. लाइफगार्ड हे जुहू, गोराई, अक्सा, गिरगाव, दादर आणि वर्सोवा येथील बीचवर तैनात केले आहेत. तर लॉकडाउनच्या काळात बुडून मृत्यू होण्यापासून 14 जणांचा बचाव करण्यात आला आहे. परंतु वांद्रे येथील बँडस्टँड येथे खडकाळ बीच असल्याने तेथे लाइफगार्डला तैनात करणे थोडे कठीण आहे.(Fraud: वृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बनावट डॉक्टरसह साथीदाराला पुण्यातून अटक)

2020 मध्ये जुहू येथे मोनिष शहा आणि अशरफ चौधरी यांचा बुडून मृत्यू झाला. त्यावेळी तेथे लाइफगार्ड तैनात नव्हते. ते दोघे मित्रांसोबत बीचवर गेले होते. त्यावेळी बीचवर जाण्यास बंदी होती तरीही ते लोक आल्याने वाद झाला. त्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याचे नगरसेवक रेनू हंसराज यांनी म्हटले. बुडून मृत्यू पावणाऱ्यांमध्ये 13-29 वयोगटातील व्यक्तींचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर मुंबईत पावसाळ्यात झोपडपट्टी परिसरात पाणी साचू नये म्हणून गटारांचे झाकण उघडले जाते. परंतु त्यावेळी नाल्यात बुडून सुद्धा मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. तर आत्महत्या करण्यासाठी काहींनी बुडून मरण्याचा मार्ग स्विकारल्याचे ही दिसून आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif