Maharashtra’s First Muslim Woman IAS Officer: आदिबा अनमने रचला इतिहास; UPSC मध्ये 142 वी रँक प्राप्त करून ठरली महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस अधिकारी

आदिबा अनमचा जन्म यवतमाळमधील एका साध्या कुटुंबात झाला, जिथे तिचे वडील ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणी आणि सामाजिक दबाव असूनही, आदिबाच्या वडिलांनी तिच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या आदिबाने स्थानिक शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

Maharashtra’s First Muslim Woman IAS Officer

महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील 26 वर्षीय आदिबा अनम (Adiba Anam) हिने इतिहास रचला आहे. तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये 142 वा अखिल भारतीय क्रमांक (AIR) मिळवला असून, यासह तिने महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस अधिकारी होण्याचा मान प्राप्त केला आहे. आदिबाचे वडील ऑटोरिक्षा चालक आहेत. तिने आर्थिक आणि सामाजिक अडथळ्यांवर मात करत, कोणत्याही औपचारिक कोचिंगशिवाय, भारतातील सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवले. आदिबाच्या या प्रेरणादायी प्रवासाने लाखो मुलींना, विशेषतः अल्पसंख्याक समुदायातील मुलींना, स्वप्ने साकार करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

आदिबा अनमचा जन्म यवतमाळमधील एका साध्या कुटुंबात झाला, जिथे तिचे वडील ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणी आणि सामाजिक दबाव असूनही, आदिबाच्या वडिलांनी तिच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या आदिबाने स्थानिक शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि नंतर उच्च शिक्षणासाठी मुंबईतील हज हाऊस येथे प्रवेश घेतला. हज हाऊस हे विशेषतः अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी युपीएससी तयारीसाठी एक परवडणारे केंद्र आहे. पुढे, तिने दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या रेसिडेन्शियल कोचिंग अकादमी (RCA) मध्ये प्रवेश घेतला, जिथे तिने स्वतःच्या मेहनतीने युपीएससीची तयारी केली.

Maharashtra’s First Muslim Woman IAS Officer:

16 एप्रिल 2025 रोजी UPSC CSE 2024 चा निकाल जाहीर झाला, ज्यात 1,016 उमेदवार निवडले गेले. या यादीत आदिबा अनमने 142 वा क्रमांक मिळवला, आणि ती महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस अधिकारी ठरली. महाराष्ट्रात यापूर्वी अनेक महिला आयएएस अधिकारी झाल्या आहेत, परंतु आदिबा ही पहिली मुस्लिम महिला आहे. यामुळे अल्पसंख्याक समुदायातील महिलांना नागरी सेवेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आदिबाच्या या प्रवासाने दाखवून दिले की, मेहनत, दृढनिश्चय, आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने कोणतीही उंची गाठता येते. (हेही वाचा: Maharashtra HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा 12 परीक्षेचा निकाल, प्रतिक्षा संपली; घ्या अधिक जाणून)

दरम्यान, 2024 मध्ये 9,92,599 उमेदवारांनी अर्ज केले, त्यापैकी 5.83 लाखांनी प्राथमिक परीक्षा दिली, 14,627 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले, आणि 2,845 उमेदवार मुलाखतीसाठी निवडले गेले. अंतिम निकालात 725 पुरुष आणि 284 महिला उमेदवारांची निवड झाली, ज्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा लक्षणीय आहे. यामध्ये डोंगरे अर्चित पराग (AIR 3), आदिबा अनम (AIR 142), राहूल (AIR 26), समीर खोडे (AIR 42) यांसारख्या उमेदवारांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement