Coronavirus Cases In Maharashtra: गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 7,827 नवे कोरोना रुग्ण, तर 173 जणांचा मृत्यू
तर दिवसभरात 173 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,54,427 इतकी झाली आहे. आतापर्यंत राज्यात 1,40,325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु, दुर्देवाने 10,289 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (State Health Department) माहिती दिली आहे.
Coronavirus Cases In Maharashtra: गेल्या 24 तासात महाराष्ट्रात (Maharashtra) 7,827 नवे कोरोना रुग्ण आढळून आहे आहेत. तर दिवसभरात 173 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,54,427 इतकी झाली आहे. आतापर्यंत राज्यात 1,40,325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु, दुर्देवाने 10,289 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (State Health Department) माहिती दिली आहे.
राज्यात आज एकूण 3340 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या महाराष्ट्रात रिकव्हरी रेट 55.15 टक्के इतका आहे. याशिवाय 6 लाखांपेक्षा अधिक लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई शहरात आढळून येत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या आकड्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. (हेही वाचा - COVID19 Cases in Dharavi Today: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 2 हजार 375 जणांना कोरोनाची लागण; दिवसभरात 5 नव्या रुग्णांची नोंद)
दरम्यान, भारतात मागील 24 तासांत 28,637 नवे रुग्ण आढळून आले असून 551 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 8,49,553 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत 22,674 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. शनिवारी देशात 19,235 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तसेच 5,34,621 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.