Coronavirus Cases In Maharashtra: गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 295 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू, तर 7,074 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
Coronavirus Cases In Maharashtra: गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 295 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला असून 7,074 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,00,064 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 8671 जणांचा कोरोना विषाणूमुळे बळी गेला आहे. तसेच सध्या 83295 जणांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे.

कोरोना विषाणूने राज्यात थैमान घातलं आहे. शहरी भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याउलट ग्रामीण भागांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग कमी प्रमाणात होत आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात त्यांनी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश दिले. (हेही वाचा - कोरोना आणि पावसाळ्यातील आजारांच्या एकत्रित मुकाबल्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश)
Maharashtra reported 7,074 COVID-19 cases and 295 deaths in the last 24 hours, taking total number of cases to 2,00,064 and death toll to 8,671. Number of active cases stands at 83,295: State Health Department pic.twitter.com/1khzthSUgi
— ANI (@ANI) July 4, 2020
राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई शहरात आढळून येत आहे. आज मुंबईत 1180 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 68 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 82814 इतकी झाली आहे. आतापर्यंत 53463 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबई शहरात 24524 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत मुंबई शहरात 4827 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2020 09:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).